Team India : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत टीम इंडिया (Team India) ग्रुप-ए मध्ये आपले दोन्ही सामने जिंकून गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. त्यामुळे भारतीय संघ सुपरमध्ये पोहोचली आहे. तर दुसरीकडे हाँगकाँग आणि पाकिस्तान यांच्यात जिंकणारा संध थेट सुपरमध्ये पोहोचेल तर दुसरा संघ थेट स्पर्धेबाहेर जाणार आहे. दरम्यान भारत आधीच सुपर-4 मध्ये पोहोचला असल्याने आता थेट 4 सप्टेंबरला भारताचा सामना असेल. त्यामुळे त्याआधी भारतीय संघ मजा-मस्ती करताना दिसत आहे. दुबईतील समुद्र किनाऱ्यावर भारतीय खेळाडू मस्ती करतानाचा व्हिडीओ बीसीसीआयने पोस्ट केला असून यामध्ये खेळाडू शर्ट काढून वॉलीबॉलचा आनंद घेताना दिसत आहेत. 






व्हिडिओमध्ये सर्वच खेळाडू मजा-मस्ती करताना दिसत आहेत. यामध्ये युजवेंद्र चहलचा आवाज येत असून तो म्हणत आहे की, आज सुट्टी असल्याने आम्हाला राहुल सरांनी (Rahul Dravid) मजा करण्याची परवानगी दिली. त्यामुळे आम्ही आता खूप मजा येणार आहे. याचवेळी, तो सर्व खेळाडूंकडे बोट दाखवत म्हणतो आहे की,'तुम्ही पाहू शकता की सर्व खेळाडू किती आनंदी आहेत, तसंच अशी एकत्र मजा-मस्ती केल्यावर टीम बॉडिंग आणखी चांगली होते. 


पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान मुकाबला?



भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा एकदा लढत होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने हाँगकाँगचा पराभव केल्यास सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. सुपर 4 मध्ये असणाऱ्या संघाचा प्रत्येकाबरोबर सामना होणार आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि भारत यांच्या पुन्हा एकदा सामना होण्याची शक्यता आहे. हा सामना रविवारी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय दोन्ही संघामध्ये फायनल होण्याची शक्यताही काही क्रीडा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 



हे देखील वाचा-