Asia Cup 2022: दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात (Bangladesh vs Sri Lanka) काल (1 सप्टेंबर 2022) खेळण्यात आलेला सामना अशिया चषकातील आतापर्यंतचा सर्वात रोमांचक सामना ठरला. या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं बांगलादेशचा दोन विकेट्सनं पराभव करून सुपर-4 मध्ये स्थान मिळवलं. श्रीलंकेविरुद्ध पराभवानंतर बांगलादेशच्या संघाचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आलंय. दरम्यान, आशिया चषकातून बाहेर पडल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनची (Shakib al Hasan) मोठी प्रतिक्रिया आलीय.
शाकीब अल हसन काय म्हणाला?
बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसननं श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाचं कौतुक केलं. या खेळाडूनं उत्कृष्ट खेळाचं दृश्य मांडल्याचं त्यानं म्हटलंय. "आम्हाला लवकर विकेट घ्यायच्या होत्या. परंतु, गोलंदाजांना त्यांनी बनवलेल्या प्लॅनिंगनुसार गोलंदाजी करता आली नाही. त्यामुळं फिरकीपटूला अखेरचं षटक टाकवं लागलं. आमचा संघ गेल्या सहा महिन्यापासून खराब फॉर्मशी झुंज देतोय. पण आशिया चषकाच्या दोन्ही सामन्यांमध्ये आम्ही चांगली खेळी केली." टी-20 विश्वचषकाबाबत म्हणाला की, विश्वचषकात आमच्यासमोर एक वेगळं आव्हान असेल. आम्हाला आमच्या खेळात आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. आम्ही आमच्या चाहत्यांसाठी निराश आहोत.
थरारक सामन्यात श्रीलंकेचा बांगलादेशचा विजय
आशिया चषकातील पाचव्या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघाला गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर बांगलादेशच्या संघानं 20 षटकात 7 विकेट्स गमावून श्रीलंकेसमोर 184 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्त्युत्तरात श्रीलंकेच्या संघानं दोन विकेट्स राखून हा सामना जिंकला. याविजयासह श्रीलंकेच्या संघानं सुपर-4 मध्ये एन्ट्री केलीय. तर, बांगलादेशच्या संघाचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे.
सुपर-4 मध्ये स्थान मिळवलेले संघ
आशिया चषकातील सुपर-4 मध्ये आतापर्यंत तीन संघांनी एन्ट्री केलीय. सर्वात प्रथम 'ब' गटातून अफगाणिस्तानच्या संघानं सुपर- 4 मध्ये धडक दिली. त्यानंतर 'अ' गटातून भारतानं पाकिस्तान आणि हाँगकाँगचा पराभव करत सुपर-4 मध्ये स्थान मिळवलं. आता श्रीलंकेचा संघही सुपर-4 मध्ये पोहचलाय. आज हाँगकाँग आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर सुपर-4 चा चौथा संघही निश्चित होणार आहे.
हे देखील वाचा-