Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेमध्ये 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान संघ (India vs Pakistan) आमनेसामने आले होते. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. भारतीय संघाकडून अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजा यांनी शानदार खेळी केली. दरम्यान या सामन्यात पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे संघात नसल्याने पाकिस्तानला मोठा तोटा झाला. दरम्यान या सामन्यानंतर आता शाहीन आफ्रिदीचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये शाहीन आणि एक भारतीय फॅन यांच्यातल मजेशीर संभाषण होताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


या व्हिडीओमध्ये भारतीय चाहता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीशी बोलताना म्हणाला, ''तू खेळला नाहीस, हे चांगले आहे. ज्याला उत्तर देताना शाहीन आफ्रिदीने मी वाचलो, असा रिप्लाय दिला. यानंतर पाकिस्तानी वेगवान गोलंदाज आणि भारतीय चाहत्याने मजा मस्ती करत फोटोसाठी पोज देखील दिली. दोघांमधील संभाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान भारताविरुद्धच्या सामन्यात 19 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तसेच, त्याने आपल्या कामगिरीनं सर्वांनाच प्रभावित केलं.






शाहीन आफ्रिदीने स्पर्धेपूर्वी घेतली टीम इंडियाची भेट


आशिया चषक 2022 मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने भारतीय खेळाडू युजवेंद्र चहल, विराट कोहली, ऋषभ पंत आणि केएल राहुलसह अनेक भारतीय खेळाडूंची भेट घेतली होती. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली जेव्हा शाहीन आफ्रिदीला भेटला तेव्हा त्याच्या दुखापतीबद्दल माहिती देखील घेतली. तर शाहीन आफ्रिदीने विराट कोहलीने लवकरात लवकर फॉर्ममध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. शाहीन आफ्रिदीला दुखापतीमुळे आशिया कप 2022 मधून बाहेर पडावे लागले होते.



हे देखील वाचा-