Asia Cup Winner List, 1983 to 2022 : आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तान संघाला (Pakistan vs Sri Lanka) 23 धावांनी मात देत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या श्रीलंका संघाची स्पर्धेची सुरुवातही खराब झाली होती, पण त्यानंतर त्यांनी दमदार पुनरागमन करत थेट फायनल गाठत अंतिम सामनाही जिंकला आहे. श्रीलंकेनं यंदा ट्रॉफी जिंकत सहाव्यांदा आशिया चषक जिंकला आहे.  यामुळे सर्वाधिक वेळा चषक मिळवणाऱ्यांच्या यादीत भारतानंतर श्रीलंका संघ दुसऱ्या स्थानी कायम आहे.

तर आशिया चषक स्पर्धेचा विचार करता 1983-84 पासून म्हणजे भारताने 1983 चा विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच या स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी पहिल्याच हंगामात भारतानं विजय मिळवत स्पर्धेचा श्रीगणेशा केला. त्यानंतर आतापर्यंत 14 वेळा आशिया चषक स्पर्धा पार पडली. यावेळी भारतीय संघ आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. भारतानं आतापर्यंत सर्वाधिक वेळा म्हणजेच सात वेळा आशिया चषकाचा खिताब जिंकलाय. त्यानंतर श्रीलंकेच्या संघानं सहा वेळा आशिया चषक स्पर्धा जिंकलीय. या यादीत पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांना दोन वेळा आशिया चषक जिंकता आलाय. तर नेमकी आतापर्यंतची आशिया चषक विजेत्यांच्या यादी कशी आहे ते पाहूया...

आशिया चषक विजेत्या संघाची यादी:

क्रमांक वर्ष विजयी संघ
1 1983/84 भारत
2 1985/86 श्रीलंका
3 1988/89 भारत
4 1990/91  भारत
5 1994/95  भारत
6 1997 श्रीलंका
7 2000  पाकिस्तान
8 2004  श्रीलंका
9 2008 श्रीलंका
10 2010  भारत
11 2011/12 पाकिस्तान
12 2013/14  श्रीलंका
13 2016  भारत (टी-20)
14 2018 भारत
15 2022 श्रीलंका (टी-20)

हे देखील वाचा-