Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) अलीकडे अधिक सिनेमांमध्ये झळकत नसली तरी ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ती क्रिकेट स्टार्सशी अफेअरच्या चर्चांमुळे सध्या चर्चेत असते. आधी भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंतसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा झाल्या. ज्यानंतर आता पाकिस्तानच्या नसीम शाहबरोबर (Naseem Shah) आणि तिच्या नात्याची चर्चा होत आहे. उर्वशीने आशिया कप 2022 मधील भारत-पाकिस्तान सामन्याला हजेरी लावल्यानंतर तिच्या आणि नसीमच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. सोशल मीडियावर विविध मीम्स व्हायरल होऊ लागले. या सर्वानंतर आता नसीमला याबाबत विचारणा केली असता त्याने स्पष्ट उत्तर देत या सर्व चर्चांना फुलस्टॉप लावला आहे.


काय म्हणाला नसीम शाह? 


पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहने उर्वशीसोबतच्या नात्यावर वक्तव्य करताना म्हटले आहे की, 'कोण आहे उर्वशी, काय आहे, लोक असे व्हिडिओ का बनवतात, मला कळत नाही. माझ्यासाठी सध्या अशी कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही. सध्या माझे लक्ष फक्त क्रिकेटवर आहे आणि मला क्रिकेट खेळायचे आहे.' दरम्यान नसीमच्या या वक्तव्यानंतर आता आणखी मीम्स व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये नसीमच्या या बोलण्याने उर्वशीचं हार्टब्रेक झालं असे एडिटेड व्हिडीओ मीमर्स पोस्ट करत आहेत. दरम्यान आता नसीमच्या या वक्तव्यावर उर्वशी काय आणि कशी प्रतिक्रिया देते? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.






पाकिस्तान फायनलसाठी सज्ज


आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत आज अंतिम सामना श्रीलंका आणि पाकिस्तान  (Sri Lanka vs Pakistan) या दोघांमध्ये रंगणार आहे. दोन्ही संघानी सुपर 4 मध्ये सर्वाधिक सामने जिंकत फायनलमध्ये धडक घेतली आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघाची स्पर्धेची सुरुवात पराभवाने झाली होती, श्रीलंकेला अफगाणिस्तानने तर पाकिस्तानला भारताने सलामीच्या सामन्यात मात दिली होती. त्यानंतर मात्र दोघांनी उर्वरीत सामन्यात कमाल कामगिरी करत थेट फायनलपर्यंत धडक घेतली आहे.  यावेळी पाकिस्तान संघाचा विचार करता त्यांनी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सुपर 4 च्या सामन्यात अष्टपैलू स्टार खेळाडू शादाब खान आणि युवा गोलंदाज नसीम शाह यांना विश्रांती दिली होती. त्यांच्या जागी उस्मान कादिर आणि हसन अली यांना संघात घेण्यात आलं होतं. पण आता फायनलमध्ये शादाब खान आणि नसीम शाह दोघंही परतले असल्याने उस्मान कादिर आणि हसन अलीला विश्रांती दिली जाऊ शकते.  


हे देखील वाचा-