Momin Saqib Meets Virat Kohli : 'ओ भाई.. मारो मुझे मारो' या व्हायरल व्हिडिओबद्दल जवळपास (Meme Video) सर्वांनाच माहित आहे. हे शब्द दररोज सोशल मीडियावर कोणत्या न कोणत्या मीममध्ये पाहायला मिळतात. तर हा मूळचा व्हिडीओ भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यानंतर पाकिस्तानच्य़ा पराभवानंतर व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती मोमीन साकिब (Momin Saqib) हा असून तो पाकिस्तान क्रिकेट संघाचा एक मोठा चाहता आहे.  


त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर तो कायमच एकापेक्षा एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट करत असतो. रविवारी भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यादरम्यानही साकिबने अनेक मजेदार व्हिडिओ शेअर केले. यातील एका व्हिडिओमध्ये तो विराट कोहलीला भेटतानाही दिसला. या व्हिडिओमध्ये कोहली आणि साकिब पंजाबीमध्ये मजेदार संवाद साधताना दिसत आहेत.






यानंतर साकिबने सामन्याचा हिरो हार्दिक पांड्याचीही (Hardik Pandya) भेट घेतली. तो हार्दिकला म्हणतो, 'तुझ्या पुनरागमनाबद्दल अभिनंदन. तू खूप छान खेळलास. आता पुन्हा आपली भेट अंतिम फेरीत होईल.' ज्यावर हार्दीकनेही धन्यवाद देत होकार दिला. 






अखेरच्या षटकात भारताचा रोमहर्षक विजय


पाकिस्ताननं आधी फलंदाजी करत मोहम्मद रिझवानच्या (Mohammad Rizwan) 43 आणि इफ्तिकारच्या 28 तसंच दहानीच्या याच्या स्फोटक 16 धावांच्या मदतीनं भारतासमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं. भारताला केएल राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं 46 चेंडूत 49 धावांची भागेदारी करत संघाचा डाव सावरला. या सामन्यात रोहित शर्मा 12 तर, विराट कोहली 35 धावा करून बाद झाला. यानंतर रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्यानं दमदार फंलदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले. दोघांनी 52 धावांची भागेदारी केली. अखेरच्या षटकात भारताला 7 धावांची गरज असताना रवींद्र जाडेजा आऊट झालाय. परंतु, हार्दिक पांड्यानं विजयी षटकार ठोकून पाकिस्तानला पराभूत केलं 


हे देखील वाचा-