India vs Pakistan, Asia Cup 2022: संयुक्त अरब अमीरात (UAE) येथे सुरु असलेल्या आशिया चषकाचा लीग स्टेज शेवटच्या टप्प्यावर आहे. यावेळी ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीनं खेळवली जाणार आहे. दोन गटात विभागलेल्या सहा संघांपैकी 4 संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील. अफगाणिस्तान, भारत आणि श्रीलंका यांनी सुपर-4 मध्ये स्थान निश्चित केलंय. तर, पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात आज होणाऱ्या सामन्यानंतर चौथ्या संघाचेही चित्र स्पष्ट होणार आहे. यामुळं सुपर 4 मध्ये भारतीय संघ कोणाशी भिडणार? याचा निर्णय काही तास दूर आहे.
आशिया चषकात दोन गटात सहा संघाचं विभाजन करण्यात आलंय. भारत 'अ' गटात असून त्यांच्या गटात पाकिस्तान आणि हॉंगकाँचा समावेश आहे. तर, 'ब' गटात अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशचा समावेश आहे. गट-अ आणि गट-ब मधील अव्वल दोन संघ सुपर-4 टप्प्यात पोहोचतील. हे सामने 3 सप्टेंबरपासून सुरू होतील. श्रीलंका आणि बांगलादेशचा पराभव करून अफगाणिस्तानच्या संघानं सुपर- 4 मध्ये धडक दिली. त्यानंतर भारतानं पाकिस्तान आणि हाँगकाँगविरुद्ध विजय मिळवून सुपर-4 मध्ये स्थान मिळवलंय. तसेच बांगलादेशला दोन विकेट्सनं नमवून श्रीलंकेच्या संघही सुपर-4 मध्ये पोहचलाय. आज पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात आशिया चषकातील लीग स्टेजचा अखेरचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणार संघ सुपर-4 मधील त्यांचं स्थान निश्चित करेल.
आशिया चषक 2022 सुपर-4 चं वेळापत्रक
1) अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका- 3 सप्टेंबर 2022
2) भारत विरुद्ध ---- (पाकिस्तान किंवा हॉंगकाँग, जो संघ क्लालिफाय करेल) - 4 सप्टेंबर 2022
3) भारत विरुद्ध श्रीलंका- 6 सप्टेंबर 2022
4) अफगाणिस्तान (पाकिस्तान किंवा हॉंगकाँग, जो संघ क्लालिफाय करेल) 7 सप्टेंबर 2022
5) भारत विरुद्ध अफगाणिस्तान- 8 सप्टेंबर 2022
6) श्रीलंका विरुद्ध ---- (पाकिस्तान किंवा हॉंगकाँग, जो संघ क्लालिफाय करेल)- 9 सप्टेंबर 2022
पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार?
पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमने सामने येण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात आज निर्णायक सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघाला सुपर-4 चं तिकीट मिळेल. हाँगकाँगच्या तुलनेत पाकिस्तानचा संघ अधिक मजबूत आहे. यामुळं पाकिस्तानचं सुपर-4 मध्ये जागा मिळवणं जवळपास निश्चित मानलं जातंय.
हे देखील वाचा-