India vs Pakistan Live : भारत आणि पाकिस्तान  (India vs Pakistan) हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना आज रंगणार आहे. आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेला 27 ऑगस्ट रोजी सुरुवात झाली असून अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला मात दिली. आता भारत आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK 2022) खेळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे.


कधी आहे सामना?


आज 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील पहिला सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सामना सामना सुरु होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवला जाणार आहे.  


कुठे पाहता येणार सामना?


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. तसंच हॉटस्टार (Hotstar) अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.   


कसे आहेत दोन्ही संघ?


भारताचा संघ:


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.


पाकिस्तानचा संघ:


बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.


हे देखील वाचा-