नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार खेळाडू महेंद्र सिंह धोनीचं क्रिकेटमधील करिअर त्याची आयपीएल- 2020 मधील कामगिरीवरुन ठरेल, असं माजी कर्णधार अनिल कुंबळेनं म्हटलं आहे. आयपीएल स्पर्धेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे महेंद्र सिंह धोनी आयपीएलमध्ये कसं प्रदर्शन करतो, यावरून ठरेल की तो टीम इंडियाचा भाग असेल की नाही, असं कुंबळेने म्हटलं.

Continues below advertisement

धोनीचं आयपीएलमधील प्रदर्शन खुप महत्त्वाचं ठरणार आहे. टीम इंडियाला धोनीचा कसा फायदा होईल, यावरुन धोनीच्या संघातील सहभागाबाबत विचार केला जाईल. त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल, असं अनिल कुंबळेने म्हटलं.

आपल्या करिअरबाबतचा निर्णय धोनीच घेईल : गांगुली

Continues below advertisement

धोनीने त्याच्या आगामी क्रिकेट भवितव्याबाबत आणि प्लानिंगबाबत कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत चर्चा नक्कीच केली असेल. धोनी टीम इंडियाचा स्टार खेळाडू आहे. धोनी सारखा खेळाडू पुन्हा मिळणे कठीण आहे. त्यामुळे आपल्या करिअरबाबत काय करायचं हा निर्णय धोनीला घ्यायचा आहे. मी धोनीशी बातचित नाही केली, मात्र तो भारतीय क्रिकेटचा चॅम्पियन आहे. धोनी सारखा खेळाडू आपल्याला लवकर मिळणार नाही. मात्र आता खेळायचं की नाही, याचा निर्णय धोनीला घ्यायचा आहे, असं बीसीसीआचा अध्यक्ष सौरभ गांगुलीने म्हटलं होतं.

वर्ल्ड कपची सेमीफायनल अखेरचा खेळलेला सामना

आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषकाचा सेमीफायनलचा सामना धोनीने खेळलेला शेवटचा सामना आहे. या सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. त्यामुळे टीम इंडिया विश्वचषकातून बाहेर झाली होती. विश्वचषकात धोनीच्या फलंदाजीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. विश्वचषकानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी धोनीने आर्मी ट्रेनिंगला जाण्याचं कारण देत, वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांमध्ये धोनी संघाचा भाग नव्हता. त्यामुळे धोनीच्या क्रिकेट करिअरबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र बीसीसीआय आणि धोनी याबाबत काय निर्णय घेणार आणि धोनी पुन्हा मैदानात कधी दिसणार याकडे क्रिकेट चाहत्यांचा लक्ष आहे.

धोनीने भारताला आपल्या नेतृत्त्वात 2007 मध्ये पहिला टी-20 विश्वचषक जिंकून दिला आहे. त्यानंतर 2011 मध्ये तब्बल 28 वर्षानंतर धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरलं होतं. त्याआधी 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्त्वात भारताने विश्वचषक जिंकण्याची कमाल केली होती.

संबंधित बातम्या