या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता असताना, कार्तिकनं सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियानं विजयासाठीचं 167 धावांचं लक्ष्य पार केलं.
दिनेश कार्तिकनं आठ चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 29 धावांची खेळी मॅचविनिंग ठरली. भारताचा हा थरारक विजय होता.
अमिताभ बच्चन यांची स्तुतीसुमनं
या विजयानंतर दिनेश कार्तिकवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत होता. यावेळी बिग बी अमिताभ बच्चनही मागे राहिले नाहीत.
अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर टीम इंडियाचं कौतुक केलंच, शिवाय दिनेश कार्तिकवरही स्तुतीसुमनं उधळली. मात्र घाईगडबडीत अमिताभ बच्चन यांनी हलकीशी चूक केली. मात्र या महानायकाने आपल्या छोट्याशा चुकीबद्दल जाहीर माफीही मागितली.
अमिताभ बच्चन यांचं ट्विट
भारताने विजय मिळवताच अमिताभ यांनी ट्विट केलं. “भारत जिंकला!! तिरंगी मालिकेत बांगलादेशविरुद्ध विजय... थरारक सामना...कार्तिकची जबरदस्त फलंदाजी..शेवटच्या 2 षटकात 24 धावांची गरज होती....एका चेंडूवर 5 धावांची गरज होती...कार्तिकने षटकार ठोकला.. अविश्वसनीय!!! अभिनंदन!”
असं अमिताभ बच्चन म्हणाले.
मात्र भारताला शेवटच्या 2 षटकात 34 धावांची गरज होती. हे लक्षात येताच बच्चन यांनी काही वेळात नवं ट्विट केलं.
बच्चन म्हणाले, “2 षटकात 24 नव्हे तर 34 धावांची गरज होती....दिनेश कार्तिकची माफी मागतो... “
संबंधित बातम्या
शंकरच्या विकेटमागे लपला होता भारताचा विजय!
देशवासियांनो मला माफ करा, रुबेल हुसेनची भावूक पोस्ट
VIDEO : दिनेश कार्तिकचा विजयी षटकार आणि टीम इंडियाचं सेलिब्रेशन
दिनेश कार्तिकच्या षटकाराने शार्दूलचा जबरदस्त झेल झाकोळला!
... म्हणून दिनेश कार्तिकचा विजयी षटकार रोहित शर्माने पाहिला नाही!
तिरंगी मालिकेत भारताला विजेतेपदासह गुणवान शिलेदारही मिळाले!