Malaysia Open 2022: मलेशिया ओपन 2022 स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) थायलंडच्या आणि जागतिक क्रमवारीत 10 व्या क्रमांकाच्या पोर्नपावी चोचुवाँगचा 21-13, 21-17 असा पराभव केला. पण लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता सायना नेहवालला (Saina Nehwal) जागतिक क्रमवारीत 33 व्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या आयरिस वांगकडून 11- 21, 17-17 असा पराभव पत्कारावा लागलाय. 


पीव्ही सिंधुचा विजय
पीव्ही सिंधूची थायलंडच्या पोर्नपावी चोचुवाँगशी स्पर्धा होती, पीव्ही सिंधूनं सलग दोन सेट जिंकून सामना जिंकला. सिंधूनं पहिल्या सेटमध्ये पोर्नपावीचा सहज पराभव केला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने पलटवार करताना कडवे आव्हान दिले, मात्र पॉर्नपावीला दुसरा सेट जिंकण्यात यश आलं नाही. सिंधूनं दुसरा सेट 21-17 नं असा जिंकला.अशाप्रकारे पीव्ही सिंधूनं सलग दोन सेट जिंकून सामना जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश केला.


पहिल्याच फेरीत सायना नेहवालचा पराभव
दुसरीकडे, सायना नेहवाल पहिलाच सामना गमावल्यानं स्पर्धेतून बाहेर पडली. नेहवालची पहिल्या फेरीत अमेरिकेच्या आयरिस वांगशी गाठ पडली. ज्यामध्ये सायना नेहवालला 21-11, 21-17 असा पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय भारताच्या बी सुमीथ रेड्डी अश्विनी पोनप्पालाही मिश्र दुहेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं असून त्यांनचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. 


बी साई प्रणीत, समीर वर्माही स्पर्धेतून बाहेर
मंगळवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात  साई प्रणीत आणि समीर वर्मा आधीच या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. बी साई प्रणीतला इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिंटिंगकडून 21-15, 19-21, 21-9 असा पराभव पत्करावा लागला. तर, समीर वर्माला इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीकडून 21-14, 13-21, 21-7 असा पराभव पत्करावा लागला.


हे देखील वाचा-