सीएट क्रिकेट पुरस्कार सोहळ्यामध्ये रहाणे बोलत होता. ''स्वतःच्या तयारीसाठी वेळ मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण हे स्पष्ट आहे, की वन डे संघात समावेश नसल्यामुळे आता पूर्ण लक्ष इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेवर केंद्रित करायचं आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी तयारीला चांगला वेळ मिळेल. त्यानंतर इंग्लंड दौरा होणार आहे,'' असं तो म्हणाला.
दरम्यान, अजिंक्य रहाणेने वन डे आणि टी-20 टीममध्ये समावेश न झाल्यामुळे नाराजी जाहीर करणं टाळलं. आपण बिलकुल नाराज नसल्याचं तो म्हणाला. ''खरं सांगायचं तर ही संधी प्रेरणादायी आहे, कारण, आता मी पुनरागमनाच्या तयारीला लागलो आहे. पुन्हा पुनरागमन करेन याचा विश्वास आहे आणि छोट्या फॉरमॅटमध्येही चांगली कामगिरी करु शकतो, शिवाय 2019 चा विश्वकपही येत आहे,'' असं त्याने सांगितलं.
''मला अजूनही स्वतःवर विश्वास आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी स्वतःला सिद्ध केलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकावीराचा (चार अर्धशतकांसाठी) मान मिळाला, ऑस्ट्रेलियाविरुद्धही चांगली खेळी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघ व्यवस्थापनाने मला चौथ्या क्रमांकावर उतरवण्याचा निर्णय घेतला आणि तिथेही चांगली खेळी केली. त्यामुळे मला अजूनही विश्वास आहे, की मी पुनरागमन करेन आणि छोट्या फॉरमॅटमध्येही चांगली कामगिरी करेन,'' असा विश्वास रहाणेने व्यक्त केला.
पाकिस्तानने भलेही इंग्लंडला पहिल्या कसोटीत साडे तीन दिवसात हरवलं असेल, पण याचा अर्थ असा नाही, की भारतासाठी ही मालिका सोपी असेल. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध मैदानात पूर्ण तयारीनिशीच उतरु असंही त्याने सांगितलं.
संबंधित बातम्या :
... म्हणून भारतीय संघात रोहित शर्माऐवजी करुण नायरला संधी