Nashik Mahayuti Melava नाशिक : रविवारी महायुतीच्या संपूर्ण राज्यात बैठका पार पडत आहेत. त्याच्याच एक भाग म्हणून नाशिकमध्ये (Nashik) ही महायुतीची (Nashik Mahayuti Melava) बैठक पार पडली. सर्व पक्षाचे लोक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी सगळ्या पक्षांचे इथे उपस्थित होते. वेगवेगळ्या मुद्द्यांवर येथे विचार ठेवण्यात आले. पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीला एकत्रित सामोरे जायचे आहे. 48 च्या 48 खासदार महायुतीचे निवडून येतील या दृष्टिकोनातून कामकाज करण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी दिली. 


नाशिक येथे महायुतीच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. सातपूर परिसरातील हॉटेल डेमोक्रसीमध्ये हा मेळावा पार पडला. बैठकीला शिवसेनेकडून मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, भाजपकडून आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले तसेच अजित पवार गटाकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार सरोज आहिरे, आमदार दिलीप बनकर,आमदार नितीन पवार उपस्थित आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना भसे आणि झिरवाळ बोलत होते. 


त्यांनाही सन्मानाची वागणून दिली गेली


नाशिकच्या महायुतीच्या बैठकीत मित्र पक्षांची कुरबुरी समोर आली. मित्रपक्ष फक्त म्हणू नका तशी वागणूक द्या नाहीतर आम्ही मिठासारखे आहोत लक्षात ठेवा, असे प्रकाश आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रकाश लोंढे यांनी भाषणात म्हटले. यावर पत्रकारांनी विचारले असता  लहान सहान गोष्टी घरातल्या असतात आणि त्यांनाही सन्मानाची वागणून दिली गेली असल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले. 


48 च्या 48 जागा निवडून आणण्याचा प्रयत्न


नरहरी झिरवाळ स्वतः लोकसभा लढवणार याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, मी इच्छा नाही बोलून दाखवली. मी फक्त माझ्यावर उदाहरण घेतले की, 45 प्लस म्हणतात तर 3 कोण पडणार मी जर इच्छुक आहे तर मला 3 मध्ये धरता की 45 मध्ये धरता. त्यामुळे 48 च्या 48 निवडून येतील, अशा पद्धतीचा प्रयत्न महायुतीचा आहे. 


प्रत्येक कार्यकर्ता उमेदवार असेल


नाशिक लोकसभा जागावाटपाबाबत पालकमंत्री दादा भुसे म्हणाले की, महायुतीचे नेते जे कोणी उमेदवार देतील आणि आमच्या समोरचे उमेदवार हे महत्वाचे नाही. आमच्या समोर प्रमुख विषय हा आहे की परत एकदा भारताच्या पंतप्रधान पदावर माननीय नरेंद्र मोदी विराजमान झाले पाहिजे. आमच्यासाठी पंतप्रधान उमेदवार आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवार राहील. 


त्यामुळे भुजबळ आले नसतील


नाशिकमधील महायुतीच्या बैठकीला छगन भुजबळ अनुपस्थित होते. यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा रंगली होती. यावर दादा भुसे यांना विचारले असता ते म्हणाले की, जे कोणत्या नियोजित कार्यक्रमात असतील. त्या निमित्ताने ते बाहेर असतील, त्यामुळे ते आले नसतील. परंतु असा काही विषय नाही त्यांचे सगळे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


आमचं उद्दिष्ट एकच पुन्हा पंतप्रधान मोदीच


मिलिंद देवरा यांनी रविवारी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. यावर दादा भुसे म्हणाले की, तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल अनेक चांगलं काम केलेले नेते हे महायुतीत शामिल होतील. कारण आमचं सगळ्यांच उद्दिष्ट आहे की पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी हे विराजमान झाले पाहिजे. 


आणखी वाचा


Chhagan Bhujbal : "येवल्याच्या जनतेने माझा दोर 'नायलॉन मांजा'सारखा पक्का केलाय, माझी पतंग..."; छगन भुजबळांची फटकेबाजी