रिओ दि जनैरो : रिओ ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी ग्रेट ब्रिटनचा जलतरणपटू अॅडम पीटीनं नवा विश्वविक्रम रचला. पुरुषांच्या 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात अॅडम पीटीनं 57.55 सेकंदाची वेळ नोंदवून आपलाच विश्वविक्रम मोडून काढला.

 

अॅडम पीटीनं गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 57.98 सेकंदाची वेळ नोंदवली होती.

 

दरम्यान, अॅडम पीटीनं 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकाराची उपांत्य फेरी गाठली असून त्याच्याकडून आता सुवर्णपदकाची अपेक्षा केली जाते आहे. कारण 1988 सालानंतर ग्रेट ब्रिटनच्या एकाही जलतरणपटूला ऑलिम्पिकचं सुवर्णपदक जिंकता आलेलं नाही आहे.