नाशिक: गंगापूर धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु झाल्यानं गोदावरी नदीत होणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. परिणामी गोदावरीच्या पुराची पातळी पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे.


 

गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे अगोदरच नुकसान झालं असताना नदीची पुराची पातळी पुन्हा वाढण्यानं नाशिकरांची चिंता वाढली आहे. गोदावरीच्या पुरामुळे दुतोंड्या मारुतीच्या डोक्यापर्यंत पाणी गेलं आहे. त्यामुळे नाशिक शहारासह जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या गंगापूर धरणातून 15 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.