मुंबई : इंडियन इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमुळे (IPL) जगभरातील क्रिकेटपटूंचे भारत आता एक दुसरं घर होऊन गेलं आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीविषयी ते नेहमीच भारवून गेले आहेत. त्यामुळे या क्रिकेटपटूंचे नेहमीच भारताविषयी व्यक्त होणारे प्रेम आनंद द्विगुणीत करणारा असतो. क्रिकेट जगतामध्ये मिस्टर 360 म्हणून परिचित असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) घडवणाऱ्या मराठी शाळेला भेट दिली. त्याने शारदाश्रम शाळेला (AB de Villiers visits Sachin Tendulkar Sharadashram Marathi School) भेट देत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली. यावेळी विद्यार्थ्यांशी सुद्धा संवाद साधला. त्याचबरोबर त्यांना भविष्यासाठी मार्गदर्शने केले. 


डिव्हिलियर्स चौफेर फटकेबाजी


यावेळी डिव्हिलियर्सने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तो म्हणाला की मी आणि विराट कोहली आयपीएलमध्ये एकत्र खेळलो आहे. त्याची बॅटिंग आणि नेतृत्व मला आवडतं. प्रत्येक मॅचमध्ये तो भावनिकरित्या खूप गुंतलेला असतो. त्यामुळे तो प्रत्येक मॅच आव्हान म्हणूनच खेळत असतो. तो पुढे म्हणाला की, आयुष्यातील प्रत्येक सकाळ नवी संधी आपल्याला देत असते, असं मला नेहमीच वाटतं. हीच एक दिवसाची सुरुवात करण्याची संधी असते. त्याने पुढे नमूद केलं की, मला प्रत्येक बॉलवर हिट मारायला आवडतो. त्याने रशिद खान आणि मोहम्मद शमीची बॉलिंग खेळायला आवडत असल्याचेही सांगितले. तो म्हणाला की, रशीद खानची बॉलिंग खेळण्यासाठी एक आव्हान आहे. यावेळी बोलताना सुरू असलेल्या वर्ल्डकपवरती सुद्धा त्याने भाष्य केले. 



भारत जिंकला तरी आपला भाऊ जिंकला असं वाटेल 


तो म्हणाला की, आतापर्यंतच्या मॅचेस पाहिल्यास भारत फायनलपर्यंत नक्की जाईल, असं वाटतं. मात्र, साउथ आफ्रिकेने वर्ल्डकप जिंकावा अशी भावना त्याने यावेळी व्यक्त केली. वर्ल्डकपवर पहिल्यांदा साउथ आफ्रिका आपलं नाव कोरेल असेही तो यावेळी म्हणाला. त्याचबरोबर त्याने भारत जिंकला तरी आपला भाऊ जिंकला सारखे वाटेल असेही नमूद केले. 


शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचे चित्रपट आवडतात


त्यानं बॉलिवूडमधील आवडीनिवडीवर भाष्य केले. शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचे चित्रपट मला आवडतात असे त्याने सांगितले. त्याचबरोबर काही हिंदी गाणी आवडत असल्याचे म्हणाला. ये दोस्ती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे हे गाणं आवडत असल्याचे तो यावेळी म्हणाला. 


इतर महत्वाच्या बातम्या