Diwali Vastu Tips 2023 : 10 नोव्हेंबरपासून धनत्रयोदशीपासून (Dhantrayodashi 2023) पाच दिवसीय दिवाळी साजरी होणार आहे. 12 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळी आहे. घरात दिवाळीची साफसफाई चालू असते, या काळात काही खास गोष्टी मिळणे शुभ असते असे म्हणतात. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात काय म्हटंलय? जाणून घ्या


 


2023 मध्ये दिवाळी कधी आहे?


दिवाळी हा सण अतिशय खास मानला जातो. हा दिवस आनंद आणि समृद्धीशी संबंधित आहे. हिंदू धर्मातील सर्व सण-उत्सवही आपल्या शेतीशी संबंधित आहेत. खरीप पिके कार्तिक महिन्यात तयार होतात, हीच पिके काढण्याची वेळ आहे. यामुळेच देशातील शेतकरी या सणाला समृद्धीशी जोडतात. हिंदू पंचागानुसार, दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. मान्यतेनुसार दसऱ्याच्या 20 दिवसांनी दिवाळी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. यंदा तो 12 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. हा सण देशभर साजरा केला जातो. हा दिवस शासकीय सुट्टीचा आहे.


 


घरात दिवाळीची साफसफाईच्या वेळी या गोष्टी आढळलेल्या चांगल्या मानतात


दिवाळीच्या साफसफाईच्या वेळी जर तुम्हाला कवड्या दिसल्या तर समजा तुमचे नशीब लवकरच चमकणार आहे. कवडी हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. घरात कवडी असणे आर्थिक संकट दूर होण्याचे लक्षण मानले जाते.



दिवाळीच्या साफसफाईच्या वेळी तुम्हाला अचानक काही जुन्या कपड्यांमध्ये नाणी किंवा नोटा आढळल्यास ते खूप शुभ मानले जाते. नाणे सापडणे म्हणजे तुम्हाला लवकरच पैसे मिळू शकतात.



दिवाळीपूर्वी साफसफाईच्या वेळी लाल कोरे कापड आढळल्यास ते देवी लक्ष्मीच्या प्रसन्नतेचे संकेत देते, म्हणजेच देवी लक्ष्मी लवकरच तुमच्यावर कृपा करेल आणि तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल.



साफसफाई करताना कपड्यात तांदूळ आढळल्यास ते खूप शुभ मानले जाते. तांदूळ हे देवतांचे आवडते धान्य आहे. तांदूळ अचानक सापडणे घरामध्ये आशीर्वादाची उपस्थिती दर्शवते. चुकूनही त्यांना फेकून देऊ नका



दिवाळीत साफसफाई करताना काही वस्तू घराबाहेर टाकल्या पाहिजेत, जसे की बंद पडलेले घड्याळ, तुटलेली मूर्ती, फाटलेले बूट, चप्पल इ. ते घरात नकारात्मकता आणतात.


 


दिवाळी 5 दिवसांचा सण



दिवाळीचा सण पाच दिवस चालतो. या 5 दिवसांमध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात ज्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते, सणांची नावे, तारीख आणि शुभ काळ जाणून घ्या
धनत्रयोदशी 10 नोव्हेंबर 2023 शुक्रवार संध्याकाळी 05:47 ते संध्याकाळी 07:43
छोटी दिवाळी 11 नोव्हेंबर 2023 शनिवार संध्याकाळी 5.39 - रात्री 8.16
नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबर 2023 रविवार संध्याकाळी 05:39 PM - 07:35 PM
बलिप्रतिपदा, गोवर्धन पूजा 13 नोव्हेंबर 2023 सोमवार 6:14 AM- 8:35 AM
भाऊबीज 14 नोव्हेंबर 2023 मंगळवार दुपारी 1:10 ते दुपारी 3:22


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Diwali 2023: यंदाची दिवाळी खास! धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीजेची योग्य तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या