मुंबई : वर्ल्डकपमधील सर्वात मोठ्या विजयाची नोंद आज टीम इंडियाने केली. श्रीलंकेविरुद्ध मुंबईमध्ये झालेल्या वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाने पुन्हा एकदा जबरदस्त परफॉर्मन्स करताना श्रीलंकेची दाणादाण उडवली आणि तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे टीम इंडिया सेमी फायनलमध्ये दिमाखात पोहोचली आहे. या मॅचमध्ये सुद्धा जशी फलंदाजी दिमाखदार झाली तशीच गोलंदाजी सुद्धा दिमाखदार झाली.






पुन्हा एकदा शमी विरोधी संघासाठी कर्दनकाळ ठरला. त्याने पाच विकेट घेत श्रीलंकन फलंदाजीचे कंबरडे मोडले आणि भारताचा विजय निश्चित केला. तत्पूर्वी सिराजने तीन विकेट घेतल्या,तर पहिल्या चेंडूवर बुमराहने विकेट घेत दमदार सुरुवात करून दिली होती. त्यामुळे एकंदरीत सर्वोत्तम कामगिरी या सामन्यामध्ये झाली. 






जेव्हा भर मैदानात किंग कोहलीच्या अंगात अनिल कपूर संचारतो


दरम्यान भारतीय संघ गोलंदाजी करत असताना टीम श्रीलंकेच्या धडाधड विकेट कोसळत असताना मैदानावर सुद्धा अनेक मजेशीर प्रकार दिसून आले. यामध्ये विराट कोहली अग्रभागी राहिला. तो कधी डान्स करताना दिसून आला, तर कधी प्रेक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी हातवारे करताना दिसून आला. इतकंच नव्हे तर एका क्षणी तो 'मेरा नाम है लखन' गाण्यावर स्लिपमध्ये क्षेत्रक्षण करत असताना थिरकताना दिसला. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.  






विराट कोहलीची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल 


तत्पूर्वी, शुभमन गिलच्या शॉटने विराट कोहलीला खूप प्रभावित केले. वास्तविक, शुभमन गिलने क्रीजच्या बाहेर येऊन वेगवान गोलंदाजाविरुद्ध उत्कृष्ट शॉट मारला. 






यानंतर नॉन स्ट्राइकवर असलेल्या विराट कोहलीचा यावर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर विराट कोहलीने अशी प्रतिक्रिया दिली, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.






इतर महत्वाच्या बातम्या