ब्रिस्बेन : माजी यूएस ओपन चॅम्पियन डॉमिनिक थीमने ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या (Brisbane International) पात्रता सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सर्वात विषारी साप कोर्टवर आल्याने खेळ थांबविल्यानंतर विजयाची नोंद करण्यात यशस्वी झाला. पहिल्या फेरीच्या पात्रता सामन्यादरम्यान 20 वर्षीय ऑस्ट्रेलियन जेम्स मॅककेबविरुद्ध डॉमिनिक थिम सेटने पिछाडीवर होता तेव्हा प्रेक्षकांना कोर्टाजवळ साप दिसला.






सुरक्षा कर्मचारी त्वरीत कोर्टात गेले आणि कोर्टवर साप रेंगाळल्याने खेळाडू आणि प्रेक्षक घाबरत असल्याने पंचांना खेळ थांबवावा लागला. थीम म्हणाला, 'मला प्राणी आवडतात, पण तो म्हणाले की हा एक अतिशय विषारी साप आहे आणि तो ‘बॉल किड्स’ च्या जवळ आहे त्यामुळे ही परिस्थिती खूप धोकादायक होती.






तो म्हणाला की, 'माझ्यासोबत असे कधीच घडले नाही आणि मी ते कधीच विसरणार नाही.' हा साप 50 सेंटीमीटर लांब होता आणि ऑस्ट्रेलियातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. त्याला बाजूला करण्यात आल्यानंतर खेळ सुरू होऊ शकला आणि त्यानंतर थीमने तीन मॅच पॉइंट वाचवले आणि टायब्रेकमध्ये दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली. यानंतर 30 वर्षीय खेळाडूने 2-6, 7-6 (4), 6-4 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या अंतिम पात्रता फेरीत ऑस्ट्रियाचा सामना इटलीचा जियुलिओ झेपिएरी किंवा ओमर जसिका यांच्यातील विजेत्याशी होईल.


इतर महत्वाच्या बातम्या