Paris Olympics 2024: ऑलिंपिक 2024 ची स्पर्धा पॅरिसमध्ये 26 जुलैपासून सुरू होणार आहे. पॅरिसमध्ये 100 वर्षांनंतर तिसऱ्यांदा ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये 206 राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांचे (NOCs) सुमारे 10,500 खेळाडू सहभागी होत आहेत. यावेळी भारतातील 28 खेळाडूंचा गट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाला आगे. ज्याचे नेतृत्व विश्वविजेता नीरज चोप्रा करणार आहे.


नुकतेच नीरज चोप्राने ऑलिम्पिकच्या तयारीसाठी पॅरिसमध्ये होणारी डायमंड लीगही सोडली होती. नीरज चोपरी यांच्या नेतृत्वाखालील या संघात 17 पुरुष आणि 11 महिला खेळाडूंचा समावेश आहे. रेस वॉकर प्रियंका गोस्वामी आणि अक्षदीप सिंग या वर्षी ॲथलेटिक्समध्ये पात्र ठरणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले. याशिवाय हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे अविनाश साबळे आणि तजिंदरपाल सिंग तूर हे खेळाडूही या संघात आहेत.


सर्वांच्या नजरा भारतीय रिले संघावर-


भारताने बहामास येथे होणाऱ्या जागतिक ॲथलेटिक्स रिले 2024 स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या संघात मुहम्मद अनस, मुहम्मद अजमल, अमोज जेकब आणि राजेश रमेश यांचा समावेश आहे. क्रीडामंत्री मनसुख एल. मांडविया यांनी रविवारी पीटीआयला सांगितले की, मला पूर्ण विश्वास आहे की हा संघ एक विजयी होईल. भारतासाठी क्रीडा क्षेत्रात मोठे यश आल्याचे देखील मांडविया यांनी सांगितले. 1 ते 11 ऑगस्ट दरम्यान स्टेडियम डी फ्रान्स येथे होणाऱ्या ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेसाठी रवाना झालेल्या खेळाडूंच्या निरोप समारंभात ते बोलत होते.


भारतीय ऍथलेटिक्स संघ-


पुरुष: अविनाश साबळे (3,000 मीटर स्टीपलचेस), नीरज चोप्रा, किशोर कुमार जेना (भालाफेक), तजिंदरपाल सिंग तूर (शॉटपुट), प्रवीण चित्रवेल, अब्दुल्ला अबुबकर (तिहेरी उडी), अक्षदीप सिंग, विकास सिंग, परमजीत सिंग बिश्त (20 किमी शर्यत) वॉक), मुहम्मद अनस, मुहम्मद अजमल, अमोज जेकब, संतोष तमिलरासन, राजेश रमेश (4x400 मीटर रिले), मिन्जो चाको कुरियन (4x400 मीटर रिले), सूरज पनवार (रेस वॉक मिश्र मॅरेथॉन), सर्वेश अनिल कुशारे (उंच उडी).


महिला: किरण पहल (४०० मीटर), पारुल चौधरी (3,000 मीटर स्टीपलचेस आणि 5,000 मीटर), ज्योती याराजी (100 मीटर अडथळा), अनु राणी (भालाफेक), आभा खटुआ (शॉटपुट), ज्योतिका श्री दांडी, सुभा व्यंकटेश, विथ्या रामराज, पूवम्मा एम.आर. (4x400 मीटर रिले), प्राची (4x400 मीटर रिले), प्रियांका गोस्वामी (20 किमी रेस वॉक/रेस वॉक मिश्र मॅरेथॉन).


संबंधित बातमी:


टी-20 विश्वचषकानंतर ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकणार...; राहुल द्रविड यांनी नरेंद्र मोदींसमोर व्यक्त केला विश्वास