Best Smartphone : नवीन स्मार्टफोन खरेदी करायचाय? 40,000 रुपयांच्या बजेटमध्ये 'हे' स्मार्टफोन ठरतील उत्तम पर्याय
तुमच्या बजेटमध्ये बाजारात दमदार फिचर्स, कॅमेरा, बॅटरी बॅकअप आणि परफॉर्मन्स असलेले अनेक स्मार्टफोन आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppOnePlus 11R : 40 हजार रुपयांच्या बजेटमध्ये OnePlus 11R हा चांगला पर्याय आहे. यामध्ये Galactic Silver, 128 GB आणि 8 GB RAM आहे. OnePlus 11R ची सध्या फ्लिपकार्टवर किंमत 38,700 रुपये आहे. यामध्ये 6.7 इंच डिस्प्ले, 50MP रियर कॅमेरा, 5000 mAh बॅटरी आहे.
Xiaomi Mi 11T Pro हा ही एक दमदार फिचर्ससह येणारा स्मार्टफोनमध्ये आहे. यामध्ये मूनलाइट व्हाईट, 128 जीबी आणि जीबी रॅम असून 6.67 इंच डिस्प्ले, 108 MP रियर कॅमेरा, 5000mAh बॅटरी आहे.
Xiaomi 11T Pro 5G हायपरफोनची सध्या फ्लिपकार्टवर किंमत 38,990 रुपये आहे.
जर तुम्हाला या बजेटमध्ये तुम्हाला सॅमसंग ब्रँड खरेदी करायचा असेल, तर Samsung Galaxy S21 FE हा स्मार्टफोन उत्तम ठरेल. सध्या फ्लिपकार्टवर त्याची किंमत 39,999 रुपये आहे.
Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम + 128GB स्टोरेज आहे. तसेच, यामध्ये 6.4 इंचाची QHD स्क्रीन आहे. 16MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे. 4800 mAh बॅटरी आहे.
OnePlus Nord 3 5G हा स्मार्टफोन या बजेटमध्ये चांगला पर्याय आहे. त्याच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये आणि 16GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये आहे. पण, याची विक्री 15 जुलैपासून सुरू होणार आहे.
OnePlus Nord 3 5G हा स्मार्टफोन फक्त 5 जुलै रोजी लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP Sony IMX890 फ्लॅगशिप कॅमेरा आहे. यामध्ये 8MP वाइड अँगल लेन्स देखील आहे. कमी प्रकाशातही उत्तम फोटो काढता येतात. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.
टेक्नो ब्रँडचा हा स्मार्टफोन सध्या Amazon वर मर्यादित वेळेच्या डीलवर 36,999 रुपयांना विकला जात आहे. या फोनमध्ये 6.8 इंच FHD + Dual Curved AMOLED डिस्प्ले आहे.
Tecno Phantom X2 5G स्मार्टफोनमध्ये 64MP RGBW(G+P) OIS अल्ट्रा क्लियर नाईट कॅमेरा, 32MP फ्रंट कॅमेरा, 5160mAh बॅटरी यासह अनेक उत्कृष्ट फिचर्स आहेत.
Realme ब्रँडमधील हा स्मार्टफोन या बजेटमध्ये तुमची चांगली पसंती ठरू शकतो. Realme GT 2 Pro मध्ये 50MP + 50MP + 2MP रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी 32MP कॅमेरा आहे. यामध्ये तुम्हाला 5000 mAh लिथियम आयन बॅटरी मिळेल.
सध्या अॅमेझॉनवर Realme GT 2 Pro ची किंमत 39,870 रुपये आहे. यामध्ये 6.7 इंचाचा क्वाड एचडी डिस्प्ले आहे.