WTC Final 2021 Updates: कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस 'पाण्यात'!
भारत आणि न्यूझीलॅंडमधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आजपासून सुरु झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र आज पावसामुळं एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही.
साऊदम्पटनमधील हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. मात्र साऊदम्पटनमध्ये पाऊस असल्यानं क्रीडा प्रेमींची निराशा झाली आहे
पावसाच्या बॅटिंगमुळे पहिल्या दिवसाचा खेळ पूर्णपणे वाया गेला. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता हा सामना सुरु होणार होता.
पावसामुळे आणि आऊट फिल्डवर पावसाचे पाणी असल्याने सामना खेळला गेलाच नाही.
पंचांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर सामना सुरू करणे शक्य होणार नसल्याचे सांगितलं. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.
क्रीडारसिकांना फार दिवसांपासून याच दिवसाची प्रतीक्षा होती. सामना केव्हा आहे, कोणता संघ या सामन्याचं जेतेपद पटकावेल आणि 'जगात भारी' ठरेल, असेच प्रश्न अनेक क्रीडारसिकांच्या मनात घर करत होते.
हा सामना भारतीय संघानं जिंकल्यास विराट कोहली याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाच्या वाट्याला आलेलं हे मोठं यश ठरणार आहे.
बीसीसीआयने सामन्याच्या एक दिवस आधी अंतिम सामन्यात भाग घेणार्या 11 खेळाडूंची घोषणा केली.
अंतिम सामन्यात भारताने तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्याची उत्सुकता भारतासह जगभरातील क्रीडा रसिकांना आहे.
आता उद्या पावसाची स्थिती काय असेल यावर खेळाचं चित्र अवलंबून असेल