Shubman Gill : शुभमन गिलच्या बहिणीची सोशल मीडियावर चर्चा, बॉलिवूड सेलिब्रिटींनाही लाजवेल 'हीचं' सौंदर्य; खूपच खास आहे भावा-बहिणीचं नातं
विश्वचषकामध्ये भारताची दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीम इंडियाचा सलामीवीर 'प्रिन्स' शुभमन गिलकडूनही भारताला खूप अपेक्षा आहे. गिलने फारच कमी वयात स्वत:च्या नावावर अनेक रेकॉर्ड केले आहेत. शुभमन गिल त्याच्या विक्रमांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो.
आता सोशल मीडियावर शुभमन गिलची बहिण चर्चेत आहे. शुभमन गिलची बहिण शाहनील गिल दिसायला फारच सुंदर आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ अनेक वेळा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
शहनील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर 1 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
शाहनील नेहमी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
अनेक वेळा शहनील भाऊ शुभमन गिलचा उत्साह वाढवण्यासाठी स्टेडियमवर देखील पोहोचते. ती आयपीएलमध्येही अनेक सामने पाहण्यासाठी मैदानात पोहोचली होती.
शुभमन गिलचं त्याच्या बहिणीसोबत नातं फारच खास आहे, हे त्यांच्या इंस्टग्रामवरील पोस्टवरुन समजते.
शहनील गिलने मोहालीच्या मानव मंगल स्मार्ट शाळेतून शिक्षण घेतला आहे. शहनील गिलने चंदीगडच्या मेहरचंद महाजन या महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतलं आहे.
शहनीलने 2018-2019 मध्ये रेड रिव्हर कॉलेज पॉलिटेक्निकमधून मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केला आहे.