IND vs Pak : भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर अहमदाबादच्या दिशेने; रेल्वे प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी
भारत विरुद्ध पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यासाठी अहमदाबाद सज्ज झालं असून क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सामन्यासाठी मुंबईहून अनेक क्रिकेटप्रेमी सामना पाहण्यासाठी रवाना झाले आहेत. क्रिकेट प्रेमींसाठी आजचा सामना फार महत्त्वाचा आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की, हाय व्होल्टेज ड्रामा समजला जातो, त्यामुळे भारतीय संघाकडून क्रिकेट प्रेमींना भारतीय खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा निर्माण होतात.
भारत पाकिस्तान सामना हा भारतीय टिंब जिंकेल अशी अपेक्षा क्रिकेट प्रेमींमध्ये निर्माण होते, त्यामुळे आज भारत पाकिस्तान या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे.
image शुक्रवारी रात्री मुंबई सेंट्रलवरून अहमदाबादच्या दिशेने विशेष रेल्वे गाड्या रवाना झाल्या. अनेक क्रिकेट चाहते खास सामन्यासाठी अहमदाबादसाठी रवाना झाले.
आज भारत पाकिस्तान सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी या स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 2.00 वाजता खेळला जाईल.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा उत्साह सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये दिसून येत आहे.
मुंबई सेंट्रलसह बोरीवली स्थानकातही क्रिकेटप्रेमींची गर्दी दिसून आली.
तरुणांसह महिला आणि बच्चे कंपनीही भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी उत्सुक असल्याचं दिसून आलं.