Rishabh Pant : जय पराजय होत राहील, खेळभावना जपली अन् जगली पाहिजे, वाढवली पाहिजे, रिषभ क्विंटन डी कॉकच्या भेटीला
भारतानं दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवलं. भारताचा संघ आनंदोत्सव साजरा करत होता. तर, दक्षिण आफ्रिका पहिल्यांदा आयसीसीच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. भारतानं आफ्रिकेच्या हातून विजय हिरावला. यानंतर आफ्रिकेचे खेळाडू निराश झाले होते. भारताचा विकेट कीपर रिषभ पंतनं आफ्रिकेच्या क्विटंन डी कॉक सोबत चर्चा केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appक्विंटन डी कॉक आपल्या लेकीला घेऊन ग्राऊंडवर बसला होता. रिषभ पंतनं क्विंटन डी कॉक सोबत चर्चा करत खेळभावना महत्त्वाची असते हे दाखवून दिलं. क्विंटन डी कॉकनं देखील पराभवाचं दु:ख विसरुन रिषभसोबत चर्चा केली.
टीम इंडियाच्या विजयाचं सेलिब्रेशन करणाऱ्या सर्व खेळाडूंना रोहित शर्मानं आफ्रिकेच्या खेळाडूंसोबत हस्तोंदलन करण्यासाठी बोलावून घेतलं.
15 व्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिका कोणत्याही परिस्थितीत मॅच जिंकणार अशी स्थिती होती. क्लासेनच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर अक्षरच्या एका ओव्हरमध्ये 24 धावा मिळवल्या होत्या. मात्र, हेनरिक क्लासेन आणि मिलर मोक्याची क्षणी हार्दिकच्या गोलंदाजीवर बाद झाले.
हार्दिक पांड्यानं टीम इंडियाचं टेन्शन वाढवणाऱ्या हेनरिक क्लासेनला 52 धावांवर बाद झालं. तिथूनच मॅचचं सारं वातावरण फिरलं.