IND vs AUS Final : वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शानदार एअर शो, नरेंद्र मोदी स्टेडियमवर खास सलामी
World Cup 2023 Final : विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये नाणेफेक झाल्यानंतर लगेचच हवाई दलाच्या विमानांचा खास एअर शो पाहायला मिळाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय हवाई दलाची विमाने स्टेडियमच्या वर दिसली.
हवाई दलाची ही विमाने अहमदाबादच्या आकाशात 15 मिनिटे प्रात्यक्षिके दाखवत होती.
यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित असलेल्या क्रिकेट चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स टीमने हा एअर शो सादर केला. यावेळी हवाई दलाची 9 विमानं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरून कसरत करताना दिसली.
ही विमाने अनेक वेळा स्टेडियमवरून वेगवेगळ्या फॉर्मेशन्स तयार केल्या. विमानांचा आवाज इतका मोठा होता की स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या क्रिकेट चाहत्यांनाही त्याचा आवाज ऐकू येत नव्हता.
सूर्य किरण हा भारतीय हवाई दलाची एक टीम आहे, जो देशात एरोबॅटिक्स शो करत आहे.
ही टीम आपल्या नऊ विमानांच्या सहाय्याने हवेत वेगवेगळे फॉर्मेशन करून प्रेक्षकांना रोमांचित करते.
दोन दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये एअर शोचा सराव करण्यात आला होता, त्यामुळे चाहत्यांमध्ये हा एअर शो पाहण्याची उत्सुकता होती.
लाखोंच्या संख्येने चाहते हा सामना पाहण्यासाठी अहमदाबादेत दाखल झाले आहेत.