1983 World Cup Win : या विजयावर शतदा प्रेम करावं! 40 वर्षांपूर्वी भारताने जिंकलेला वन डे विश्वचषक
आज 25 जून, बरोबर 40 वर्षांपूर्वी 25 जून 1983 रोजी इंग्लंडमधील लॉर्डस गॅलरीमध्ये कर्णधार कपिल देवने वन डे क्रिकेटचा विश्वचषक उंचावला होता. त्या विजयाला आज 40 वर्ष पूर्ण झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर कपिल देवच्या टीम इंडियाने बलाढ्य वेस्ट इंडिजला 43 धावांनी पराभूत केलं होतं.
या विजयानंतर भारताचा क्रिकेट विश्वात दबदबा निर्माण होण्यास सुरुवात झाली.
योगायोगाने यंदाचं 2023 चं वर्ष वन डे विश्वचषकाचं वर्ष आहे. त्यामुळे 1983 च्या कपिल देव आणि 2011 च्या महेंद्रसिंग धोनीच्या टीम नंतर यंदाचा भारतीय संघ या विजयाची पुनरावृत्ती करेल का हे पाहावं लागेल. यंदाच्या विश्वचषकाचं आयोजन भारतात होत आहे.
भारतीय संघाची 1983 विश्वचषकामधील परिस्थिती अत्यंत नाजूक होती. भारताला अनेकदा दुबळ्या संघांना तोंड देण्यासाठी सुद्धा मेहनत घ्यावी लागली. मात्र, भारताच्या शिलेदारांनी भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात आणि आपल्या मेहनतीच्या बळावर 1983 च्या विश्वचषकावर नाव कोरलं.
भारताचा माजी कर्णधार कपिल देवच्या नेतृत्वात भारतानं 1983 मध्ये पहिल्यांदाच विश्वचषक जिंकलाय. 1983 च्या विश्वचषकात भारतानं चमकदार कामगिरीच्या जोरावर बलाढ्य संघ वेस्ट इंडीजचा दबदबा संपवला. भारताला विश्वचषक जिंकून देणारा कपिल देव पहिला कर्णधार ठरला. कपिल देवनंतर भारताला एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणारा महेंद्र सिंह धोनी दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.
क्रिकेटविश्वात वेस्ट इंडीजनंतर भारत दुसरा मजबूत संघ म्हणून समोर आला. विश्वचषकात फक्त वेस्ट इंडीजच्या संघानेच पहिल्या दोन ट्रॉफी जिंकून क्रिडाविश्वात आपलं वर्चस्व बनवलं. परंतु, 1983 मध्ये भारतानं विश्वचषक जिंकून वेस्ट इंडीजचं तिसऱ्या विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न मोडलं.
1983 च्या विश्वचषकात भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात 18 जून रोजी टुनब्रिज वेल्स मैदानावर सामना खेळण्यात आला होता. हा सामना भारतानं 31 धावांनी जिंकला होता. भारताच्या या विजयात कर्णधार कपिल देव यांचं मोलाचं योगदान होतं. या सामन्यात त्यांनी नाबाद 175 धावांची खेळी करत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं.परंतु दुर्दैवानं भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी कपिल यांची खेळी कॅमेऱ्यात कधीच रेकॉर्ड झाली नाही. कारण त्यावेळी देशातील एकमेव प्रसारक बीसीसीनं देशव्यापी संप पुकारला होता. ज्यामुळं कपिल देव यांची ही खेळी कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली नव्हती.