Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wimbledon 2022 : सलग चौथ्यांदा विम्बल्डन जिंकण्याचा मान नोवाकला, 21 ग्रँडस्लॅम खिशात
विम्बल्डन 2022 मध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात देत जेतेपद मिळवलं आहे.(P.C Wimbledon)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलग चौथ्यांदा नोवाकनं विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं असून आता त्याच्याकडे 21 ग्रँड स्लॅम झाली आहेत.(P.C Wimbledon)
अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात नोवाकने 4-6, 6-3, 6-4, 7-6 (3) च्या फरकाने विजय मिळवला आहे.(P.C Wimbledon)
अटीतटीच्या सामन्यात अखेर टायब्रेकर झाल्यानंतर नोवाकने विजय मिळवत जेतेपद नावे केलं आहे. (P.C Wimbledon)
जोकोविचनं मागील तीन वेळा सलग विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. ज्यानंतर आता आज त्याने विजय मिळवत विम्बल्डन 2022 च्या स्पर्धेचंही जेतेपद पटकावत सलग चौथ्यांदा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे.त्यामुळे सलग टौथ्यांदा विजेतेपद पटकावणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.(P.C Wimbledon)
शिवाय जोकोविचच्या नावावर 21 ग्रँड स्लॅम जिंकण्याची नोंद देखील झाली आहे. ज्यामुळे त्याने रॉजर फेडरर ज्याच्या नावावर 20 ग्रँड स्लॅम आहेत, त्याला मागे टाकलं आहे. या यादीत स्पेनचा राफेल नदाल 22 ग्रँड स्लॅमसह अव्वल स्थानी आहे.(P.C Wimbledon)
सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसने अटीतटीची झुंज दिली पण अखेर नोवाकच विजयी झाल्याने निकचं पहिलं वहिलं विम्बल्डन जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं(P.C Wimbledon)
नोवाकने या दमदार विजयानंतर दमदार सेलिब्रेशन मैदानातच केलं. त्याचे चाहते आणि मित्रपरिवारही यावेळी सेलिब्रेशन करत होते.(P.C Wimbledon)
नोवाकने सेमीफायनलमध्ये ब्रिटेनच्या कॅमरून नॉरीला पराभूत करून अंतिम फेरी गाठली होती.(P.C Wimbledon)
दरम्यान या विजयानंतर सर्वत्र नोवाकवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसून आला. (P.C Wimbledon)