Vinesh Phogat: आलिशान घर, महागड्या कार, सोनं-चांदी अन् बरंच काही...; आमदार झालेल्या विनेश फोगाटची संपत्ती किती?
ऑलिम्पिकपटू आणि कुस्तीपटू विनेश फोगाटने हरियाणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविनेश फोगाटने जुलाना विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या योगेश कुमार यांचा 6015 मतांनी पराभव केला.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेत अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करत थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरली.
आमदार झालेल्या विनेश फोगाटची संपत्ती नेमकी किती आहे, जाणून घ्या...
25 ऑगस्ट 1994 रोजी हरियाणातील चरखी दादरी येथे जन्मलेली विनेश फोगाट शिंपी कुटुंबातून येते. गीता फोगाट, बबिता फोगाट तिच्या चुलत बहिणी आहेत. विनेशकडे उत्पन्नाचे एकच नाही तर अनेक स्त्रोत आहेत.
विनेश फोगाटला युवा आणि क्रीडा मंत्रालयाकडून 6 लाख रुपये (प्रति महिना 50 हजार रुपये) वार्षिक वेतन मिळते.
विनेश फोगाट प्रत्येक जाहीरातीसाठी 75 लाख ते 1 कोटी रुपये आकारते.
2024 पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी विनेश फोगटची एकूण संपत्ती 5 कोटी रुपये होती, परंतु आता त्यात मोठी झेप घेतली आहे. टाईम्स नाऊ आणि एशियानेट न्यूजच्या वृत्तानुसार, विनेश फोगाटची सध्याची एकूण संपत्ती 36.5 कोटी रुपये आहे. तिच्या वाढत्या संपत्तीसह, विनेश फोगटने अनेक महागड्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे.
विनेशकडे मर्सिडीज जीएलई (1.8 कोटी), टोयोटा फॉर्च्युनर (सुमारे 35 लाख), टोयोटा इनोव्हा (28 लाख), व्होल्वो एक्ससी60, ह्युंदाई क्रेटा यांसारख्या कार आहेत.
विनेशकडे हरियाणातील खरखोडा येथे 2 कोटी रुपयांचे स्वत:चे घर आहे. जिथे ती आपल्या कुटुंबासह राहते. विनेशने तिच्याकडे 2.25 लाख रुपयांचे दागिने असल्याचे जाहीर केले आहे. विनेशचा पती सोमवीर राठी हा देखील कुस्तीपटू आहे, जो दोन वेळा राष्ट्रीय चॅम्पियन राहिला आहे.