T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील टॉप-10 रेकॉर्ड्स
सर्वाधिक धावा: टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू महेला जयवर्धनेच्या नावावर आहे. त्यानं 31 सामन्यात 1 हजार 16 धावा केल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वाधिक शतकं: ख्रिस गेलनं टी-20 विश्वचषकात सर्वाधिक दोन शतकं झळकावली आहेत. याशिवाय सात फलंदाजांनी प्रत्येकी एक-एक शतक झळकावलं आहे. या यादीत भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाचं नाव आहे.
सर्वाधिक 50+ धावा: टी-20 विश्वचषकात सर्वाधिक 50+ धावा करण्याचा विक्रम भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर आहे. त्यानं 21 सामन्यातील 10 डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
एका विश्वचषकात सर्वाधिक धावा: एका विश्वचषकात विराट कोहली सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत विराट कोहली टॉपवर आहे. त्यानं 2014 च्या टी-20 विश्वचषकात 319 धावा केल्या होत्या.
सर्वोत्कृष्ट धावसंख्या: न्यूझीलंडचा स्टार फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलमनं टी-20 विश्वचषक 2012 मध्ये बांगलादेशविरुद्ध 123 धावांची खेळी केली होती.
सर्वाधिक विकेट्स: बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकिब अल हसननं टी-20 विश्वचषकाच्या 31 सामन्यांत सर्वाधिक 41 विकेट्स घेतले आहेत.
एकाच विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स: हा विक्रम श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाच्या नावावर आहे. हसरंगानं 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 16 विकेट घेतल्या आहेत.
सर्वाधिक झेल: टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सनं 30 टी-20 विश्वचषक सामन्यांमध्ये 23 झेल घेतल्या आहेत.
सर्वाधिक स्पम्पिंग आणि झेल: टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा माजी यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीनं स्टंप्सच्या मागं राहून 33 सामन्यांत सर्वाधिक 32 विकेट्स घेतल्या आहेत.
सर्वाधिक षटकार: टी-20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. गेलनं टी-20 विश्वचषकाच्या 33 सामन्यात 63 षटकार मारले आहेत.