PHOTO: भारतीय महिलांनी इतिहास रचला; सातव्यांदा आशिया चषक जिंकला!
महिला आशिया चषकातील पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय महिलांनी त्यांचा हा निर्णय साफ चूकीचा ठरवत सुरुवातीपासून एक-एक श्रीलंकेच्या फलंदाजांना तंबूत धाडायला सुरुवात केली. श्रीलंकेच्या संघानं दुहेरी संख्या गाठण्याआधीच त्यांचे चार फलंदाज तंबूत पोहोचले होते. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)
श्रीलंकेकडून ओशादी रणसिंघेनं सर्वाधिक 13 आणि इनोका रणवीरानं नाबाद 18 धावांची खेळी केली, ज्यामुळं श्रीलंकेच्या संघाला 65 धावांपर्यंत मजल मारल मारता आली. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)
महिला आशिया चषका 2022 अंतिम आणि महत्वाच्या सामन्यात भारतीय महिला संघानं उत्कृष्ट गोलंदाजी केली. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)
भारताकडून रेणुका सिंहनं सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, तर रनआऊट करण्यातही तिनं मोलाची कामगिरी केली. त्याशिवाय राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)
श्रीलंकेनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर स्मृती मानधनासोबत सलामीला आलेली शेफाली वर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आऊट झाली. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)
त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्जही स्वस्तात माघारी परतली. मात्र, स्मृती मानधानानं दुसऱ्या बाजूनं फटकेबाजी सुरूच ठेवली. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)
स्मृती मानधनानं या सामन्यात अवघ्या 25 चेंडूत नाबाद 51 धावांची अर्धशतकीय खेळी केली. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)
भारतानं हा सामना 8 विकेट्स राखून जिंकला. श्रीलंकेकडून इनोका रनावीरा आणि कविशा दिल्हारी यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)
या विजयासह भारतीय महिलांनी सातव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं आहे. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)