T20 World Cup 2021: वर्ल्डकपच्या संघातील 10 खेळाडू IPLमधून बाहेर, 'या' खेळाडूंच्या फॉर्मची चिंता
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार होता आणि एलिमेटर लढतीत बंगळुरुला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभव सहन करावा लागला. कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये 15 लढतीत 29 च्या सरासरीने 405 धावा केल्या. यात त्याच्या 3 अर्धशतकांचा समावेश आहे. (photo tweeted by @imVkohli)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपकर्णधार रोहित शर्मा याने 13 लढतीत 29 च्या सरासरीने 381 धावा केल्या, गेल्या वर्षी त्याने 28 च्या सरासरीने 332 धावा केल्या होत्या. रोहितची कामगिरी थोडी सुधारली असली तरी समाधानकारक नाही(photo tweeted by @ImRo45)
पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल याच्या कामगिरीत सातत्य दिसले. यंदाच्या मोसमात त्याने 13 लढतीत 63 च्या सरासरीने 626 धावा केल्या. (photo tweeted by @klrahul11)
हार्दिक पांड्याच्या फिटनेसची चिंता कायम आहे. आयपीएलमध्ये त्याने गोलंदाजी केलेली नाही. तसेच फलंदाजीमध्ये त्याने 12 लढतीत 14 च्या सरासरीने 127 धावाच केल्या. (photo tweeted by @hardikpandya7)
मुंबई इंडियन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानेही 14 लढतीत 21 बळी घेत स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध केले. गेल्या मोसमात त्याने 27 बहळी घेतले होते.(photo tweeted by @Jaspritbumrah93)
पंजाब किंग्जकडून खेळणारा मोहम्मद शमी याने यंदा 14 लढतीत 19 बळी मिळवले.(photo tweeted by @MdShami11)
मुंबईचा फिरकी गोलंदाज राहुल चहरने 11 लढतीत 13 बळी घेतले. (photo tweeted by @rdchahar1)
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 11 लढतीत फक्त 6 बळी मिळवले. त्याच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे.(photo tweeted by @BhuviOfficial)
सूर्यकुमार यादव याची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. 14 लढतीत तो 23 च्या सरासरीने 317 धावा करू शकला. दुसरीकडे ईशान किशनही यंदा फ्लॉप राहिला.(photo tweeted by @surya_14kumar)