Sara Tendulkar : सारा तेंडुलकरचा इन्स्टावरील व्हिडीओ अन् चाहत्यांनी जोडलं 'या' विदेशी खेळाडूशी नाव
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) नेहमी चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appती सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते. एखाद्या अभिनेत्रीपेक्षा तिचं ग्लॅमर कमी नाही.
तिच्या इन्स्टाग्रामवर तर लाखो फॉलोअर्स असून तिच्या फोटोंवर आणि व्हिडीओंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव चाहते करतात.
साराची सोशल मीडियावर नेहमी चर्चा असते. सारा आणि अर्जुन ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलं.
अर्जुन आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळत आहे. मात्र त्याला अजून पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
सारा मुंबईच्या सपोर्टसाठी नेहमी मैदानात दिसते. तिच्यासोबत आई अंजली देखील अनेकदा दिसून आली आहे.
सारानं एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यावरुन ती पुन्हा चर्चेत आली आहे आणि चाहते वेगवेगळे कयास काढू लागले आहेत.
सोशल मीडियावर चाहते कशाचा संबंध कशाशी लावतील याचा नेम नाही. या व्हिडीओवरुन साराचं नाव मुंबई इंडियन्सचा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसशी जोडलं जात आहे.
साराच्या या व्हिडीओचा संबंध थेट बेबी एबी अशी ओळख असलेल्या डेवाल्डशी जोडला आहे.
याआधीही साराचं नाव क्रिकेटर शुभमन गिलशी जोडलं गेलं आहे. त्याच्या फोटोंवर साराच्या रिअॅक्शन पाहून चाहत्यांनी त्याही वेळी अंदाज बांधले होतेच.