Photo : चेन्नईच्या विजयाचा मानकरी ऋतुराज गायकवाडचं पुण्यात आगमन, चाहत्यांकडून जंगी स्वागत
चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर आणि यंदाचा ऑरेंज कॅपचा मानकरी ऋतुराज गायकवाड त्याच्या घरी परतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी त्याचा साधेपणा आणि परंपरेला जपणारा ऋतुराज सर्वांना भावला.
यावेळी त्याचा साधेपणा आणि परंपरेला जपणारा ऋतुराज सर्वांना भावला.
यंदाच्या आयपीएल मध्ये तर सर्वाधिक धावा करण्याचा मान ही त्यालाच मिळाला, त्याच खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये बाजी मारली. करिअरमधील सर्वोत्तम खेळी करून तो पिंपरी चिंचवडच्या घरी परतला तेंव्हा मात्र गाडीतून तो रिकाम्या पायाने उतरला.
कारण परंपरेनुसार त्याच्या पायावर पाणी ओतून त्याचं औक्षण केलं जाणार. याची त्याला कल्पना होती, अन त्याला साजेसच तो वागला. यावेळी कुटुंब आणि शेजाऱ्यांनी त्याचं जंगी स्वागत केलं.
दुबईवरून तो आज सकाळी पोहचला तेंव्हा साडे सहाची वेळ होती.
पण तरी ही ऋतुराजच्या स्वागतासाठी मोठी गर्दी पहायला मिळाली.
फटाके फोडून मिठाई भरवून त्याने आयपीएल गाजविल्याच सेलिब्रेशन करण्यात आलं.
यावेळी त्याचा साधेपणा सर्वानाच भावला.
(IPL 2021) च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला हरवून चौथ्यांदा जेतेपद पटकावले.
चेन्नईचे सलामीवीर फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली कामगिरी करत चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली.
या सामन्यात दोन्ही फलंदाजांनी भागीदारीचा अनोखा विक्रम केला. या हंगामात दोन्ही फलंदाजांमध्ये सर्वाधिक 756 धावांची भागीदारी झाली.