In Pics : क्ले कोर्टचा अनभिषिक्त सम्राट राफेल नदालचा अप्रतिम विजय, विजयानंतर नदालचा जल्लोष
स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेन नदाल (Rafael Nadal) याने ऑस्ट्रेलियन ओपनचा (Australian Open Final 2022) स्पर्धेचा अंतिम सामना जिंकत इतिहास रचला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात एका क्षणी सामना गमावत असताना पुनरागमन करत राफेलने 21 वं ग्रँडस्लॅम खिशात घालत विश्वविक्रम केला आहे.
राफेल नदालने अंतिम सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदवला मात देत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच जेतेपद पटकावलं आहे.
विजयानंतर राफेलने मोठा जल्लोष करत ट्रॉफी मिळाल्यानंतर तिचा चावा घेत नेहमीचं ठरलेलं सेलिब्रेशनही केलं.
राफेलने 2-6, 6-7, 6-4, 6-4 आणि 7-5 अशा फरकाने हा ऐतिहासिक विजय मिळवला.
या विजयासह नदालच्या खात्यात आता 21 ग्रँडस्लॅम जेतेपदे झाली आहेत. रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच यांच्या नावावर प्रत्येकी 20 ग्रँडस्लॅम असल्याने राफेलने एक नवा विश्वविक्रम केला आहे.
विजयानंतर राफेलला या सामन्यातील विजयासह सर्वाधिक ग्रँडस्लम मिळवल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. तो यावेळी कमालीचा आनंदी होता.
हा सामना राफेलने जिंकला असला तरी डॅनिल याचा खेळही उत्कृष्ट होता. सामन्यात पहिल्या सेटमध्ये डॅनेलने नदालला 6-2 अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. दुसरा सेटही डॅनेलने जिंकला पण यावेळी राफेलने कडवी झुंज दिल्यामुळे डॅनिलने 6-7 ने सेट जिंकला.
तिसऱ्या सेटमध्येही डॅनेल जिंकेल असे वाटत असताना राफेलने कमबॅक करत अप्रतिम खेळ दाखवला आणि सेट 6-4 ने जिंकला. चौथा सेटही 6-4 ने जिंकल्यानंतर अखेरचा निर्णायक सेट राफेलने 7-5 ने खिशात घालत सामन्यासह स्पर्धा जिंकत इतिहास रचला.