PHOTO : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नेमबाज रुद्रांक्ष पाटीलला सुवर्णपदक
ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने शुक्रवारी 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला. त्याने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल गटामध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयासह त्याने महाराष्ट्र संघाला सुवर्णपदकाचे खाते उघडून दिले. ठाण्याच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज रुद्रांक्षने फायनल मध्ये अचूक नेम धरत 17 गुणांची कमाई केली. यासह किताबाचा मानकरी ठरला.
महाराष्ट्र संघाचा युवा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने पात्रता फेरीमध्ये सर्वोत्तम कामगिरी सादर फायनल गाठली होती.
यंदाच्या सत्रातील सर्वोत्तम कामगिरीमुळे तो या गटामध्ये किताबाचा दावेदार मानला जात होता. हाच विश्वास सार्थकी लावत त्याने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले.
आगामी कैरो येथील आयोजित आणि चॅम्पियनशिपमध्ये तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. यातून त्याला आपली लय कायम ठेवत नॅशनल गेम्समध्ये सुवर्णपदकाचा यशस्वीपणे वेध घेता आला.
महाराष्ट्राचा युवा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने फायनलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवत त्याने सुवर्णपदक जिंकले. त्याने याच सुवर्णपदकातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
यातून महाराष्ट्राच्या नावे पहिल्या सुवर्णपदकाची नोंद झाली. त्याचीही कामगिरी निश्चितपणे युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनी रुद्रांक्षवर कौतुकाचा वर्षाव केला
सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली सोनेरी यशाची कामगिरी करत तो स्वतःची क्षमता सिद्ध करत आहे. दर्जेदार नेमबाज म्हणून आज त्याने आपला ठसा उमटवला, अशा शब्दात संघटनेच्या जनरल सेक्रेटरी शीला यांनी रुद्रांक्ष खास कौतुक केले.
तर रुद्रांक्ष पाटील हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा सुपुत्र आहे. लहानपणापासूनच रुद्रांक्षच्या आई-वडिलांनी अथक परिश्रम घेऊन हे शिखर गाठण्यासाठी त्याला मदत केली आहे