Vinesh Phogat :ध्येय अपूर्ण राहिलंय, 2032 पर्यंत कुस्ती खेळू शकते, विनेश फोगाटचे निवृत्तीवर फेरविचाराचे संकेत
पॅरिस ऑलिम्पिकमधून निलंबन झाल्यानंतर आणि सीएएसनं याचिका फेटाळल्यानंतर विनेश फोगाटची रौप्य पदकाची आशा संपली. अंतिम फेरी खेळू न शकल्यानं विनेश फोगाटनं सोशल मीडिया पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली होती. आज तिनं एक पोस्ट करुन तिच्या या वाटचालीत साथ देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. कुस्तीत पुनरागमन करण्याचे संकेत देखील तिनं दिले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविनेश फोगाटनं भावनिक पत्र लिहून तिच्या करिअरमधील अनेक गोष्टी सांगितल्या. या पत्रात तिनं 2032 पर्यंत कुस्ती खेळायची असल्याचं तिनं म्हटलंय.
माझी टीम, माझे सहकारी, सर्व भारतीय, माझे कुटुंबीय असं वाटतं की ज्या ध्येयासाठी आपण काम करत होतो, ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो, ते अपुरं राहिलंय. काही उणिवा नक्की राहिल्या असतील.
कदाचित वेगळ्या परिस्थितीमध्ये मी स्वत:2032 पर्यंत खेळताना पाहू शकेन कारण माझ्यामधील कुस्ती आणि लढाई सुरु राहील, असं विनेश म्हणाली.
विनेश फोगाटनं या पत्रात तिने वडील, आई आणि पतीबाबत भावना मांडल्या आहेत.