Mumbai Indians: होऊ दे खर्च, कोट्यवधी मोजून मुंबईला 'त्या' तीन खेळाडूंना रिटेन करावचं लागणार, रोहितचं काय होणार?
आयपीएल 2025च्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आयपीएलपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यापूर्वी संघांना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. मुंबई इंडियन्सची 2024 च्या आयपीएलमध्ये कामगिरी चांगली झाली नव्हती त्यामुळं तीन खेळाडूंना रिटेन करावंच लागणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहार्दिक पांड्या, जसप्रीत यादव, सूर्यकुमार यादव यांना मुंबईला रिटेन करावंच लागेल. हार्दिक पांड्यासाठी मुंबईचा कॅप्टन झाल्यानंतरचं पहिलं आयपीएल खराब गेलं होतं. त्यामुळं आगामी पर्वात मुंबईला कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे.
मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा रिटेन करु शकते. गुजरात टायटन्समध्ये असताना हार्दिक पांड्याला 15 कोटी रुपये मिळायचे. मुंबईनं त्याला ट्रेड करुन संघात घेतलं. त्यामुळं त्याला यावेळी देखील तेवढीच रक्कम मिळू शकते.
सूर्यकुमार यादव मुंबईच्या संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. सूर्यकुमार यादव आक्रमक फलंदाज असल्यानं त्याला मुंबईला कोणत्याही परिस्थितीमध्ये रिटेन करावं लागेल. सूर्यानं 2024 मध्ये 11 मॅचमध्ये 345 धावा केल्या होत्या. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. सूर्या सध्या भारताचा टी 20 टीमचा कॅप्टन आहे. त्याला मुंबईकडून सध्या 8 कोटी रुपये मिळतात.
जसप्रीत बुमराह मुंबईच्या गोलंदाजीचा प्रमुख आहे. मुंबई इंडियन्सला जसप्रीत बुमराहला रिटेन करणं अत्यावशक आहे. त्यानं 2024 च्या हंगामात मुंबईसाठी 20 विकेट काढल्या होत्या.
हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराहसह रोहित शर्मा देखील मुंबईचा प्रमुख खेळाडू आहे. त्याला टीम मॅनेजमेंट रिटेन करणार का ते पाहावं लागणार आहे.