In Pics : मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक, टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई
मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये (Deaflympics 2021) भारताच्या धनंजय दुबे आणि पृथ्वी शेखर या जोडीने टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत रौप्यपदकावर (Silver Medal) नाव कोरलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appब्राझीलमध्ये 24 वी मूकबधीर ऑलिम्पिक (Deaflympics) स्पर्धा पार पडत आहे. यामध्ये भारताच्या खेळाडूंनी देखील सहभाग घेतला असून त्याच्यांकडून चांगली कामगिरी सुरु आहे.
स्पर्धेत भारताचे टेनिसपटू धनंजय दुबे आणि पृथ्वी शेखर या जोडीने ही कामिगिरी केली आहे.
अंतिम सामन्यात फ्रान्सच्या मिकेल लॉरेन्ट आणि विनसेंट नोवेली यांनी भारताच्या धनंजय-पृथ्वी जोडीला मात दिली असल्याने भारत सुवर्णपदक मिळवू शकला नाही.
अंतिम सामन्यात फ्रान्सने 6-7 आणि 2-6 च्या फरकाने भारताला मात दिली आहे.
त्याआधी सेमीफायनलच्ा स्पर्धेत भारतीय जोडीने अर्जेंटिनाच्या मेटियो गॉबी आणि निकोलस लॅहीटे यांना 6-4 आणि 6-0 च्या फरकाने मात दिली होती.
गुरुवारी गोल्फर दिक्षा डागरने सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेतही भारताने रौप्यपदक जिंकलं आहे. भारताचे टेनिसपटू धनंजय दुबे आणि पृथ्वी शेखर या जोडीने ही कामिगिरी केली आहे.
त्यापूर्वी याच मूकबधीर ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन खेळात देखील सुवर्णपदक मिळवलं.
तसंच धनुष श्रीकांतने 10 मीटर एअर रायफल शूटींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं असून शौर्य सैनीने कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.
मूकबधीर ऑलिम्पिक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी 10 मीटर एअर रायफल शूटिंग स्पर्धेत आठ खेळाडूंमध्ये फायनल सामना खेळवला गेला होता.