PHOTO: 'गोल्डन' बॉयची पुन्हा 'डायमंड' कामगिरी; नीरज चोप्रानं घडवला नवा इतिहास
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग फायनल (Diamond League Final) जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये अॅथलेटिक्समधल्या प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेची मेगा फायनल पार पडली
या स्पर्धेत भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने डायमंड लीगच्या भालाफेक प्रकारात ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
हा किताब पटकावणारा नीरज चोप्रा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
नीरज चोप्राने झुरिच येथे झालेल्या फायनलमध्ये 88.44 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह विजेतेपद पटकावले.
डायमंड लीगच्या फायनलमध्ये नीरजची सुरुवात चांगली झाली नाही. त्याचा पहिला थ्रो फाऊल होता
दुसऱ्या प्रयत्नात त्याने 88.44 मीटर अंतरावर भाला फेकला.
तिसऱ्या प्रयत्नात 88.00 मीटर, चौथ्या प्रयत्नात 86.11 मीटर तर पाचव्या प्रयत्नात 87.00 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 83.60 मीटर भाला फेकला.
या अंतिम फेरीत झेक प्रजासत्ताकचा जेकोब 86.94 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरा, तर जर्मनीचा ज्युलियन वेबर 83.73 मीटर फेकसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) अंतिम फेरीत ऐतिहासिक रौप्य पदक पटकावताना नीरजला दुखापत झाली होती.