Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरज चोप्राचा 'सुवर्णफेक'! जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्ण पदक
नीरजने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत 'सुवर्ण' कामगिरी केली आहे. अंतिम फेरीत जगभरातील 12 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे.
जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना (World Athletics Championships 2023) 27 ऑगस्ट रोजी पार पडला.
महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकदाही सुवर्ण पदक जिंकलेलं नव्हतं. मात्र, नीरज चोप्राने भारतासाठी 'सुवर्ण कामगिरी' केली आहे.
जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भालाफेकमध्ये नीरज चोप्राने भारताचं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.
याआधी नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता.
नीरज चोप्रा देशासाठी वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा दुसरा खेळाडू आणि पहिला ॲथलीट आहे.
जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप 2022 मध्ये नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. दुखापतीमुळे गेल्या वेळी त्याचं सुवर्णपदक हुकलं पण, यंदा त्याने सुवर्ण पदक पटकावलं आहे.
जागतिक चॅम्पियनशिपमध्ये 'सुवर्ण' कामगिरी करणारा नीरज हा दुसरा भारतीय ठरला आहे.
नीरज चोप्राच्या आधी भारताचा माजी नेमबाज अभिनव बिंद्राने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केला होता.
ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. या माजी नेमबाजाने 2006 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं.