Bhandardara Dam : भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
Bhandardara Dam : भंडारदरा धरणातून चार हजार क्युसेक वेगाने प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
Bhandardara Dam Water Discharge
1/6
अहमदनगर जिल्हयातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढला आहे.
2/6
त्यामुळे धरणातून चार हजार क्युसेक वेगाने प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
3/6
भंडारदरा धरणाचा साठा 100 टक्के झाला असून निळवंडे धरणाचा साठा 85 टक्यांवर जाऊन पोहोचला आहे.
4/6
निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने हे पाणी जायकवाडीकडे जाणार आहे.
5/6
यामुळे मराठवाड्याला देखील मोठा दिलासा मिळणार आहे.
6/6
15 ते 20 दिवसानंतर पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली असली तरी लाभक्षेत्रात मात्र बळीराजा अद्यापही पावसाची वाट पाहत आहे.
Published at : 28 Aug 2023 09:15 AM (IST)