PHOTO : राष्ट्रीय क्रीडादिनी गोंदियातील तरुणीकडून मेजर ध्यानचंद यांना रांगोळीच्या माध्यमातून आदरांजली
आज राष्ट्रीय क्रीडा दिन. क्रीडा दिनाचं औचित्य साधून गोंदियात मेजर ध्यानचंद यांची रांगोळी साकारण्यात आली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोंदियातील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार सोनी भावना फुलसुंगे या तरुणीने ही रांगोळी रेखाटली आहे.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशात साजरा करतात.
मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये (आताच्या प्रयागराज) झाला होता.
सोनी भावना फुलसुंगे या तरुणीने मेजर ध्यानचंद यांची रांगोळी तयार करुन क्रीडाप्रेमींना नवचेतना दिली आहे.
मेजर ध्यानचंद यांनी जर्मनीचा हुकूमशाह हिटलरला देखील हॉकी खेळाच्या माध्यमातून प्रभावित केलं होतं.
देशात 29 ऑगस्ट म्हणजेच मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
या निमित्ताने क्रीडा क्षेत्राप्रती आवड निर्माण व्हावी असा रांगोळी चित्रकार सोनी फुलसुंगेचा मानस होता.
त्यामुळे तिने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून मेजर ध्यानचंद यांच्या रांगोळीला तिरंग्याच्या छटा दिल्या.
या तरुणीने केवळ हॉकीच नाही तर इतर खेळांची देखील आठवण या माध्यमातून करुन दिली आहे.