Photo : पुण्यात महाराष्ट्र केसरीचा थरार, राजकीय नेत्यांची उपस्थिती
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कुस्तीपटूंना मानधनासोबतच निवृत्तीवेतन आणि वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चंद्रकात पाटील म्हणाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व संस्कृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कुस्तीमहर्षी स्व.मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी कोथरुड इथे आयोजित 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, आयोजक तथा माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी मोठे मैदान, आकर्षक बक्षिसे तसेच खेळाडूंसाठीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या मातीतला खेळ म्हणून कुस्ती खेळाकडे बघितले जाते. कुस्ती खेळाला वैभव प्राप्त व्हावे आणि राज्यातील मल्ल ऑलिम्पिकमध्ये सहभागी होवून पदक जिकंण्याच्या दृष्टीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्याचे मत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.
कुस्तीपटूंना मानधनासोबतच निवृत्तीवेतन आणि वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मंत्री चंद्रकात पाटील यांनी सांगितले.
या स्पर्धेच्या निमित्ताने नवीन खेळाडू उदयास येत आहेत. कुस्ती खेळाडूंनी संपूर्ण आयुष्य कुस्ती खेळासाठी समर्पित करत असतात. राज्यातील कुस्तीपटूंच्या मानधनात वाढ करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
कुस्ती खेळाला प्रोत्साहन देण्यासोबतच त्यामध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने 10 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
बीडच्या आशिष तोडकर, कोल्हापूरच्या सुरज अस्वले, पुणे जिल्ह्याच्या स्वप्नील शेलार यांनी 57 किलो गटातून तर, पुणे जिल्ह्याच्या प्रतिक जगताप, कल्याणच्या ओंकार भोईर, जळगावच्या ऋषिकेश वैरागी यांनी 86 किलो वजनी गटातून आपापल्या प्रतीस्पर्धीना पराभूत करताना स्पर्धेत विजयी सलामी दिली.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उत्तम नियोजन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. या निमित्ताने मोठे मैदान, आकर्षक बक्षिसे तसेच खेळाडूंसाठीही उत्तम व्यवस्था करण्यात आली असल्याचे पाटील यावेली म्हणाले.