PHOTO : नागपूरच्या टेकडी गणपती मंदिरात अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी
विदर्भातील अष्टविनायकातील पहिले समजले जाणारे सीताबर्डी टेकडीवरील गणेश मंदिर भाविकांसाठी एक महत्त्वाचे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर व्यस्थापनाकडूनही विशेष व्यवस्था करण्यात आली.
मंदिर प्रशासनाच्या नियोजनबद्ध तयारीमुळे भाविकांनाही जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागले नाही. मुख्य प्रवेशद्वारापासूनच महिला आणि पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र रांग लागली होती.
यावेळी करण्यात आलेली आकर्षत रोषणाई मंत्रमुग्ध करणारी होती.
यावेळी आयोजित रक्तदान शिबीरालाही भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला.
नागपूरच्या टेकडी गणपती बाप्पाला विघ्नहर्ता मानले जाते. नागपूर शहरातील सीताबर्डी येथे असलेले गणपतीचे हे भव्य दिव्य मंदिर सुमारे 250 वर्षे जुने आहे.
असे म्हणतात की या मंदिरात श्री गणेशाची मूर्ती स्वयंभू आहे. म्हणजेच 250 वर्षांपूर्वी ही मूर्ती पिंपळाच्या झाडाखाली प्रकट झाली होती, असे म्हटले जाते.
हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी गणपतीची पूजा करण्याचा विधी आहे. जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. पुन्हा एकदा हा शुभ योगायोग घडला असून यावेळी पौष महिन्यातील मंगळवारी अंगारकी चतुर्थी आहे.
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या महत्त्वाबाबत पुराणात अनेक कथा प्रचलित आहेत. गणेश चतुर्थीचे मंगळवारी आगमन हे सर्वात विशेष मानले जाते.
रात्री उशिरापर्यंतही भाविकांनी मोठ्या संख्येत टेकडी मंदिराला आपल्या कुटुंबियांसह भेट दिली.