यशस्वी जयस्वालचा झंझावत, मुंबईच्या गोंलदाजांची पिसे काढली
Yashasvi Jaiswal, IPL 2023 : यशस्वी जयस्वाल याच्या झंझावाती शतकाच्या बळावर राजस्थानने 20 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 212 धावांपर्यंत मजल मारली. यशस्वी जयस्वाल याने 124 धावांची खेळी केली. यशस्वी जयस्वाल याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयशस्वी जयस्वाल मुंबईच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. यशस्वी जयस्वाल याने संघर्षातून क्रिकेटमध्ये करिअर केलेय. त्याने एकेकाळी मुंबईमध्ये पाणीपुरी विकली.
पहिल्या चेंडूपासून यशस्वी जयस्वाल याने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. यशस्वी जयस्वाल याने दमदार शतकी खेळी केली. यंदाच्या आयपीएलमधील हे तिसरे शतक होय. हॅरी ब्रूक आणि वेंकटेश अय्यर यांच्यानंतर यशस्वी जयस्वाल याने शतक झळकावले आहे. विशेष म्हणजे, वेकंटेश अय्यर आणि यशस्वी जयस्वाल यांनी मुंबईविरोधात शतकी खेळी केली आहे.
यशस्वी जयस्वाल याने आज मुंबईच्या गोलंदाजांची पिसे काढली. यशस्वी जयस्वाल याने 62 चेंडूत 124 धावांची खेळी केली. या खेळीत जयस्वाल याने 8 खणखणीत षटकार लगावले. त्याशिवाय 16 चौकारही मारले आहेत.
यशस्वी जयस्वाल याच्यानंतर राजस्थानकडून सर्वाधिक धावा अतिरिक्त आहेत. 124 धावांची खेळी करत यशस्वी जयस्वाल याने ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवलाय. यशस्वी जयस्वाल याने 9 सामन्यात 428 धावांचा पाऊस पाडलाय.
यशस्वी जयस्वाल याने यंदाच्या आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्याही नोंदवली. हॅरी ब्रूक याने यंदाच्या आयपीएलमधील पहिले शतक झळकावले होते. त्यानंतर वेंकटेश अय्यर याने मुंबईविरोधात वानखेडे मैदानावर शतक ठोकले होते. त्यानंतर यशस्वी जयस्वाल याने आज वानखेडेच्या मैदानावर शतकी खेळी केली. जयस्वाल याने या शतकी खेळीसह ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवलाय.
जयस्वाल याने 124 धावांची शतकी खेळी करत ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवलाय. यशस्वी जयस्वाल याने फाफ डु प्लेसिस याला मागे टाकलेय. यशस्वी जयस्वाल 428 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.