Election 2024 Exit Polls
(Source: ABP CVoter)
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने हरणारे टॉप 5 कर्णधार कोण?; एमएस धोनी अव्वल स्थानी, पाहा यादी
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने हरलेल्या कर्णधारांच्या यादीत महेंद्रसिंग धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत महेंद्रसिंग धोनीने कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधिक 91 सामने गमावले आहेत. (फोटो क्रेडिट- आयपीएल)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 70 सामने गमावले. (फोटो क्रेडिट- आयपीएल)
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विक्रमी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे, मात्र कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने गमावलेल्या कर्णधारांच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला 67 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. (फोटो क्रेडिट- आयपीएल)
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने गमावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत गौतम गंभीर चौथ्या स्थानावर आहे. गौतम गंभीरने कर्णधार म्हणून 47 सामने गमावले. (फोटो क्रेडिट- आयपीएल)
डेव्हिड वॉर्नर या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. आयपीएल सामन्यांमध्ये डेव्हिड वॉर्नर कर्णधार म्हणून 41 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. (फोटो क्रेडिट- आयपीएल)