छत्रपती संभाजीनगरमध्ये अग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत
छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) छावणी परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.
Chhatrapati Sambhajinagar Fire News
1/10
छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) छावणी परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग
2/10
आगीमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे.
3/10
कपड्याच्या दुकानाला आग नेमकी कशामुळं लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही.
4/10
या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालं आहे.
5/10
मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
6/10
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
7/10
मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे.
8/10
या घटनेत अग्निशमाक दलाचा एक जवानही जखमी झाला आहे.
9/10
आग लागलेल्या इमारतीत एकूण 16 लोक होते. पहिल्या मजल्यावर 7 लोक होते. तर दुसऱ्या मजल्यावर 7 लोक होते आणि तिसऱ्या मजल्यावर 2 लोक होते. यामध्ये दुसऱ्या मजल्यावरील सर्व सात लोकांचा मृत्यू झाला आहे.
10/10
आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
Published at : 03 Apr 2024 08:25 AM (IST)