IPL 2023 : भरमैदानात कोहली आणि गंभीर एकमेकांना भिडले, तिघांना कोट्यवधीचा दंड; नक्की प्रकरण काय?
आयपीएलच्या (IPL 2023) आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल बीसीसीआयने (BCCI) विराट कोहली (Virat Kohli), गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि नवीन-उल-हक यांच्यावर कठोर कारवाई केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लखनौच्या एकना स्टेडियमवर सोमवारी झालेल्या सामन्यादरम्यान झालेल्या वादामुळे कोहली, गंभीरसह नवीनला बीसीसीआयनं दंड ठोठावला आहे.
लेव्हल 2 गुन्ह्यात अंतर्गत दोषी आढळल्याने विराट कोहली, गौतम गंभीर यांना त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तर, नवीन-उल-हकने त्याच्या लेव्हल 1 च्या गुन्ह्याअंतर्गत दोषी आढळल्याने त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के रक्कम दंड ठोठावला आहे.
गंभीर, कोहली आणि नवीन यांनी गुन्ह्यांची कबुली दिली असून दंड स्वीकारला आहे.
लखनौच्या इकाना स्टेडिअमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) पराभव केला.
image 3
लखनौचा (LSG) त्यांच्याच घरच्या मैदानावर बंगळुरुकडून (RCB) 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. दरम्यान, सामन्यानंतर (LSG vs RCB Match) विराट कोहली (Virat Kohli) आणि लखनौ संघाचा मार्गदर्शक (Lucknow Super Giants Mentor) गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
लखनौ आणि बंगळुरु यांच्यात सामना रंगला. हा सामना आरसीबीनं जिंकला. सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाली.
लखनौचा फलंदाज अमित मिश्रा, आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि लखनौचे सहाय्यक प्रशिक्षक विजय दहिया यांनी हा वाद सोडवला. यानंतर कोहली लखनौचा कर्णधार केएल राहुलशी बोलतानाही दिसला. दरम्यान, हे भांडण कोणत्या कारणावरून सुरु झालं यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.