IPL Records : एका डावात सर्वाधिक धावा करणारे यष्टीरक्षक फलंदाज, 'ही' आहे यादी
आयपीएल 2022 पूर्वी काही महत्त्वाच्या रेकॉर्ड्सवर नजर फिरवुया.. यातील एक म्हणजे एका डावात सर्वाधिक धावा करणारे टॉप पाच यष्टीरक्षक फलंदाज कोण आहेत हे पाहुया...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया टॉप 5 मध्ये चार भारतीय फलंदाज आहेत. ज्यात सर्वात पहिलं नाव म्हणजे, आतापर्यंत पंजाब संघाची धुरा सांभळणारा नुकताच लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार झालेला केएल राहुल
राहुलने एका आयपीएल सामन्यात नाबाद 132 धावा केल्या असून त्याचे हे रेकॉर्ड आतापर्यंत कोणालाच मोडता आलेलं नाही.
यायादीत दुसऱ्या स्थानावर आहे, भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant). पंतने एका डावात नाबाद 128 धावा केल्या असून यंदाही तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे.
राजस्थान रॉयल्सचा हुकूमी एक्का संजू सॅमसन या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने एका सामन्यात 119 धावा स्कोरबोर्डवर लगावल्या असून संजूला यंदाही राजस्थानने 14 कोटींना रिटेन केलं आहे.
तर चौथ्या स्थानावर रिद्धिमान साहा असून त्याने एका डावात नाबाद 115 रन केले आहेत. आयपीएल 2022 च्या लिलावात गुजरात टायटन्सने त्याला 1.90 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे.
तर पाचव्या स्थानावर या यादीत यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो असून त्याने एका डावात नाबाद 114 धावा केल्या आहेत. यंदा तो पंजाब किंग्समध्ये 6.75 कोटी रुपये घेत शामिल झाला आहे.
यादीत सहाव्या स्थानावर अॅडम गिलख्रिस्ट असून त्याने नाबाद 109 धावा केल्या आहेत.